Translate :

Sponsored

Pope Fransis Passed away : पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास दीर्घ आजाराने झाले निधन .

रोम,इटली : 2025-04-21

पोप फ्रान्सिस (Pope Fransis) यांचे वयाच्या ८८ वर्षी दिर्घकालिन आजाराने निधन झाले आहे. नुकतेच ते इस्टरच्या दिवशी सेंट पिटर स्वेअर येथे मोठ्या जनसमुदायाला सामोरे गेले होते. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांचे निधन झाल्याने ख्रिश्चन धर्मिय बांधवांमध्ये शोकाकूल वातावरण आहे.

पोप फ्रान्सिस (Pope Fransis) यांचे रोम, इटली येथे वयाच्या ८८ वर्षी दिर्घकालिन आजारानंतर निधन झाले आहे. असे निवेदन व्हॅटिकन सिटी येथून अधिकृतरीत्या जाहिर करण्यात आले आहे. आज सकाळी साडेसात वाजता रोमचे बिशप फ्रान्सिस आपला पिता येशू ख्रिस्त याच्याकडे गेले आहे. त्यांचे संपर्ण आयुष्य हे चर्च आणि ईश्वर यासाठीच वाहून घेतलेले होते, असे निवेदन व्हॅटिकन येथून देण्यात आले आहे.

त्यांनी आयुष्यभर जगाला आणि विशेषकरून दीनदुबळ्यांना विश्वासाने, धाडसाने आणि वैश्विक प्रेमाने जगण्याची शिकवण दिली.  ते प्रभू येशूचे खरे उपासक होते. त्यांच्या या कामाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करून पोप फ्रिन्सिसच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. रोमन कॅथलिक चर्चसाठी पोप म्हणून काम पहाणारे पोप फ्रान्सिस हे पहिले लॅटिन अमेरिकन होते. १३ मार्च २०१३ मध्ये त्यांच्या या पदासाठी नियक्ति करण्यात आली होती. त्यांनी या पदावर काम करताना त्यांनी चर्चच्या काही गोपनिय आणि तणाग्रस्त वाटणाऱ्या गोष्टींमध्ये बदल केला होता, ही त्यांच्या कारकिर्दिची महत्त्वाती बाब म्हणता येईल.

रविवारी इस्टर संडेच्या दिवशी पोप फ्रान्सिस यांनी अचानक लोकांमध्ये येऊन लोकांचे अभिवादन स्विकारले होते. यावेळी 35 हजाराच्यावर जनसमुदाय उपस्थित होता. दिर्घकालिन आजरावरील उपचारानंतर पहिल्यांदाच त्यांनी हा दौरा आयोजित केला होता. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाल्याने कॅथेलिक चर्चमध्ये शोककळा पसरली आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored