Translate :

Sponsored

महाराष्ट्रातील 51 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या ; 5 नवीन DCP ची नियुक्ती : Police Officers Transfer 51 IPS Officers Transferred In Maharashtra, 5 New DCPs Appointed

 Maharashtra Police Officers Transfer : पुण्यातील शस्र तपासणी शाखेच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य काखीव पोलिस दल  ( SRPF) गट 1 , पुणे येथे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

पुणे : 28/06/2025

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने 51 भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आणि 81 राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनंगर यासारख्या प्रमुख शहरांसह अनेक जिल्ह्यामध्ये या बदल्या करण्यात आल्या आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. या निर्णयाचे उद्दिष्ट प्रशासकिय काम मजबूत करणे आणि पोलिस यंत्रणा अधिक प्रभावी बनवणे आहे. यामध्ये 51 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांचा समावेश असून, काही अधिकाऱ्यांना पदोन्नती तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. 

पुण्यातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे बदली करण्यात आली आहे. तसेच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांचीही बदली झाली आहे. सरकराच्या नव्या आदेशानुसार, पुणे शहरात तीन नव्या पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्याही सुरूच

गेल्या पंधरा दिवसांत आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मागील आठवड्यात आणखी चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच, अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांची पुण्यातील यशदा (Yashada ) संस्थेच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने प्रशासकीय कार्यक्षमसेसाठी मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले आहे. 

कोणाला कोणती जबाबदारी ?

बदल्यांच्या क्रमानुसार पुण्यातील शस्र तपासणी शाखेच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट 1, पुणे येथे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे शहरातील पोलिस उपायुक्त (डिसीपी) महेंद्र पंडित यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. डीसीपी (वाहतूक) अमोल झेंडे यांना दौंड येथील एसआरपीएफमध्ये कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे. विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील , स्मिता पाटील यांना मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored