PM Narendra Modi : आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर पंतप्रधानांनी संघाशी संवाद साधला. त्यांनी या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. टीम इंडियाने मोदींना जर्सी सुद्धा भेट दिली.
दिल्ली : 06/11/2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट टीमची भेट घेतली. टीम इंडियाने पहिल्यांदाच महिला विश्वचषकावर नाव कोरले आहे. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला नमवले. महिला संघाने यानंतर पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना टीम इंडीयाची जर्सी भेट देण्यात आली. यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रोड्रिग्जसह सर्व खेळाडू आणि टिम इंडियाचे कोच अमोल मुझुमदार हे उपस्थित होते.
तुमची स्किन इतकी ग्लो कशी करते ? (PM Narendra Modi)
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, मोठा आहे. आज देव दिवाळी आहे. गुरू पर्व असल्याचे सांगितले. आज मी तुम्हाला एकू इच्छित असल्याते त्यांनी महिला खेळाडूंना म्हटले. सर्व खेळाडूंनी यावेळी पंतप्रधानांशी गप्पा मारल्या. गप्पांमध्ये संधी मिळताच हरलीन देओल या अप्रतिम झेल टिपणाऱ्या महिला खेळाडूने पंतप्रधानांना एक खास सवाल केला. त्यावरून तिथे सर्वांचे चेहरे खुलले.
” सर , मला तुमचे स्कीन केअर रूटीन काय आहे, ते विचारायचे आहे. तुमची स्कीन खूप ग्लो करते”. असा प्रश्न केला. त्यावर पंतप्रधानांनी या प्रश्नावर उत्तर दिले. ते म्हणाले हे लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद आहे. राजकारणात शीर्ष स्थानी काम करताना आता 25 वर्षे झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
दीप्ती शर्माच्या टॅटूविषयी (PM Narendra Modi)
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दीप्ती शर्मा यांना तुमची मैदानावर खूप दादागिरी चालते असे मी ऐकल्याचे म्हटले. त्यावेळी दीप्तीने त्वार उत्तर दिले की, असे काही नाही सर, पण बॉल थ्रो करताना, सर्वच म्हणतात की, आपल्या टीमच्या खेळाडूंकडे थ्रो करताना जरा हळू फेक.” तर पंतप्रधानांनी आपल्या हातावरील हनुमानाचा टॅटू पाहून त्याविषयी विचारले. त्यांना माझ्या इन्स्टाग्राम टॅगलाईनची माहिती असल्याचे पाहून मला आनंद झाला, अशी प्रतिक्रिया दीप्तीने दिली.
शेफाली वर्मानेही तिचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, तिच्या करिअरमध्ये वडिलांचा मोठा हातभार आहे. तिचे वडील क्रिकेटर होऊ इच्छित होते. पण त्यांना ते जमले नाही. पण त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले. आपला भाऊ पण क्रिकेटर असल्याचे तीन आवर्जून सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी हरमनप्रीतला चेंडूविषयी सवाल केला. हरमनप्रीत चेंडू खिशात ठेवण्याविषयी सांगितले की, अखेरचा झेल मी टिपला, पण त्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पहात होते. त्यामुळेच हा चेंडू मी जवळ ठेवला आहे.