PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ते साइप्रस या देशात पोहोचले आहेत. साइप्रस देशाचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइडस् यांनी त्यांना साइप्रसच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कराने सन्मानित केले. नरेंद्र मोदी असे पहिले पंतप्रधान आहेत, जे साइप्रस गेले आहेत.
निकोसिया : 2025-06-16
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) आपल्या तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्या दौऱ्यातील पहिला देश हा साइप्रस आहे. त्यांना साइप्रस सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरिक सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस ।।। ने सन्मानित केले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी साइप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइडस यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) तीन देशांच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. या दौऱ्यादरम्यान ते साइप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांना भेटी देणार आहेत. कॅनडामध्ये ते जी- 7 परिषदेला हजेरी लावणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी साइप्रस येथे सांगितले की, भारत लवकरच जगातील तीसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. साइप्रस मधील अनेक कंपन्यांसाठी भारतात असणाऱ्या असंख्य संधींचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. मोदी आपल्या परदेश दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात साइप्रस येथे आहेत.
तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी साइप्रस च्या राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्यासह रविवारी निकोसिया येथे व्यापार गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले. विदेश मंत्रालयाकडून नवी दिल्ली मध्ये एक निवेदन जाहिर केले आहे की, पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांतील भारताच्या वेगाने झालेल्या आर्थिक बदलांचा उल्लेख केला. स्थिर राजकारण आणि सुरळित होणारा व्यापार यांमुळे भारताची अर्थव्यवस्था ही, जगातील सर्वात वेगाने बदणारी आणि प्रगती करणारी अर्थव्यवस्था बनली आहे.
नवोन्मेष, डिजीटल क्रांती, स्टार्ट-्अप्स आणि भविष्यकालीन पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यावर भर देत, त्यांनी विश्वास व्यक्त केला की जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत, काही वर्षात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी योग्य स्थितीत आहे. मोदी यांनी म्हटले आहे की, भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आम्ही कर सुधारणा, वस्तू आणि सेवा कर, तर्कंसंगत कॉर्पोरेट कर, गुन्हेगारीमुक्त कायदे लागू केले आहेत आणि व्यवसाय सुलभता तसेच व्यवसाय करण्याच्या आत्मविश्वासावर लक्ष केंद्रीत करत आहेत.
साइप्रस भारताचा महत्त्वाचा भागिदार
भारतातील व्यवसायांमध्ये साइप्रसच्या कंपन्यांना भागिदारी करण्यासाठी अनेक संधी असल्याचे मोदी यांनी सांगितले. 23 वर्षात पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधानांनी साइप्रसला भेट देऊन, व्यापार परिषदेला हजेरी लावली आहे.