PM Narendra Modi In Norway : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप आणि गल्फमधील काही देशांच्या दौऱ्यांवर आहे. दौऱ्यावर असताना नॉर्वेच्या एका पत्रकाराने त्यांना काही प्रश्न विचारले. मात्र मोदी यांनी तो प्रश्न ऐकला की नाही, हे समजले नाही. मात्र ते उत्तर न देताच निघून गेले. या घटनेची चर्चा विदेशातील मीडियामध्ये चांगलीच रंगलेली आहे.
नॉर्वे : 19-05-2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi In Norway) यांना सोमवारी विचारण्यात आले की, ते नॉर्वेजियन माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे का देत नाहीत. पंतप्रधान आणि त्यांचे ऩॉर्वेजियन समकक्ष जोनास गार स्टोअर यांनी माध्यमांसमोर निवदेन वाचून दाखवल्यानंतर मोदी सभागृहातून बाहेर पडत असताना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी तो ऐकला की नाही हे स्पष्ट नाही, पण ते थांबले नाही आणि सभागृहातून निघून गेेले.
“पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र माध्यमांच्या (नॉर्वेच्या) प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत. ? स्टोअर यांच्यासोबत खोलीतून बाहेर जाण्यासाठी वळलेल्या मोदीना नॉर्वेजियन पत्रकार हेले लिंग यांनी मोठ्याने विचारले. बाहेर जाण्यासाठी वळताना मोदी जात असताना, लिंग यांनी आपला एक प्रश्न विचारला होता. मात्र मोदी न थांबता सावकाश पावले टाकत निघून गेले.
हा व्हिडिओ लिंग यांनी स्वतः या शिर्षकाखाली पोस्ट केला आहे. “भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी, माझा प्रश्न घेणार नाहीत. मला तशी अपेक्षाही नव्हती.
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांकात नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत 157 व्या क्रमांकावर असून, पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिराती आणि क्युबा यांच्याशी स्पर्धा करत आहे. ज्या शक्तींसोबत आपण सहकार्य करतो, त्यांना प्रश्न विचारणे हे आपले काम आहे.
राहुल गांधीची टिका (PM Narendra Modi In Norway)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही क्लिप ‘एक्स’वर शेअर केली आणि म्हणाले की, ” जेव्हा लपवण्यासारखं काही नसतं, तेव्हा घाबरण्यासारखंही काही नसतं. जेव्हा जग एका अडचणीत सापडलेल्या पंतप्रधानांना घाबरेलेले आणि काही प्रश्नांपासून पळ काढताना पाहते, तेव्हा भारताच्या प्रतिमेचे काय होते ? “
पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर असताना, ते परदेशी माध्यमांना उत्तरे देण्यास अनुत्सुक असतात. ही गोष्ट परदेशी माध्यमांनी निदर्शनास आणून देण्याती ही दुसरी वेळ आहे.शनिवारी नेदरलँडसमध्ये, एका डच वृत्तपत्राच्या पत्रकाराने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव (पश्चिम ) सिबी जॉर्ज यांना विचारले की, यावेळी दोन्ही पंतप्रधान प्रश्नांसाठी उपलब्ध का नाहीत.
नेदरलँडसमध्ये अशी प्रथा आहे की, अशा दोऱ्यानंतर दोन्ही पंतप्रधान प्रश्नांसाठी सामोरे जातात. आज तसे का झाले नाही, याचे मला आश्चर्य वाटत आहे, असे येथील पत्रकाराने म्हटले आहे.जॉर्ज यांनी प्रश्नाला बगल दिली. त्यांनी माध्यम स्वतंत्र्य आणि अल्पसंख्यांकाच्या हक्कांविषयीच्या डच प्रश्नांना विरोध करत म्हटले की, भारताविषयीच्या अज्ञानामुळे हे प्रश्न विचारले जात आहेत.
अशा द्विपक्षीय दौऱ्यानंतर दोन्ही देशप्रमुखांनी माध्यमांच्या प्रत्येकी दोन प्रश्नांना उत्तरे देणे, ही लोकशाही जगात एक प्रथा आहे. तथापि, मोदींनी पदभार स्विकारल्यापासून ही प्रथा बंद झाली आहे. तहीरी, असे प्रसंग आले आहेत जेव्हा दुसऱ्या बाजूने पत्रकारांना प्रत्येकी दोन प्रश्न विचारण्याची परवानगी देण्याचा आग्रह धरला जातो.
याचे शेवटचे उदाहरण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला दुसरा कार्यकाळ सुरू केला त्यावेळचे. गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेला मोदींचा अमेरिका दौऱा.
सर्वोच्च नागरी सन्मान (PM Narendra Modi In Norway)
भारत-नॉर्वे संबंधांना पुढे नेण्यात दिलेल्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या नेतृत्वासाठी मोदींना सोमवारी नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान,’ ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान कऱण्यात आला.
एका विशेष समारंभात, नॉर्वेचे राजे हॅराल्ड पंचम यांनी मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ हा पुरस्कार प्रदान केला.
या सन्मानाबद्दल मोदींनी राजे आणि नॉर्वेच्या लोकांचे मनःपूर्वर आभार मानले. त्यांनी हा पुरस्कार भारत आणि नॉर्वे यांच्यातील “ऐतिहासिक मैत्रिला” समर्पित केला आणि दोन्ही देशांतील लोकांमध्ये असलेल्या चिरस्थायी स्नेह, विश्वास आणि आपुलकीला दिलेली ही एक आदरांजली असल्याते म्हटले. हा पुरस्कार भारत आणि नॉर्वे यांच्यात असलेल्या सदिच्छेच्या दृझ संबंधांचे प्रतीक आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवदेनात म्हटले आहे.