Translate :

Sponsored

Pm Narendra Modi G-7 summit Invite Canada Mark Carney Visit : जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी; भारत-कॅनडा संबंधांची होऊ शकते नवी सुरूवात, मार्क कार्नी यांनी दिले आमंत्रण.

G-7 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) या महिन्यात कॅनडाला रवाना होणार आहेत. जी-7 शिखर परिषदेतेत सहभागी होण्यासाठी ते जाणार आहेत. त्यांना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी फोनवरून येण्याचे निमंत्रण दिले आहे. 

नवी दिल्ली : 2025-06-06

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) या महिन्या अखेरीस आयोजित होणाऱ्या जी-7 शिखर( G-7 summit) परिषदेत सहभागी होणार आहेत. यावर्षी ही जागतिक बैठक कॅनडामधील कनानैस्किस येथे होणार आहे. भारताला याठिकाणी विशेष आमंत्रित देशाच्या स्वरूपात बोलावण्यात आले आहे. स्वतः कॅनडाचे नव-निर्वाचित प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या फोनविषयीची माहिती एका पोस्टद्वारे दिली आहे. यावेळी त्यांनी कार्नी यांचे निवडणुकीत मिळालेल्या यशासाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. हा दौरा भारत-कॅनडा संबंध सुधारण्याच्या दृष्टीने एक पाऊल समजले जात आहे. 

कॅनडामधील सरकार बदलल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील अशी आशा उत्पन्न झाली आहे. मागच्या कॅनडातील सरकारमुळे खलिस्तानी कारवायांना लक्षात घेऊन भारत-कॅनडा संबंध तणावपूर्ण झाले होते. मात्र मार्क कार्नि हे सत्तेवर आल्यानंतरचा हा भारत-कॅनडामधील सर्वात मोठा राजनैतिक संवाद होणार आहे. अशा सर्व पार्श्वभूमीमुळे पंतप्रधान मोदी यांची ही भेट फक्त एक परिषदेपुरती नक्कीच सिमीत नाही. खरंतर या भेटीचा उद्देश भारत-कॅनडा संबंधांना परत एकदा सुरळीत करून, त्यांना योग्य दिशा देण्याच्यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. 

भारत-कॅनडा संबंधांसाठी नवी आशा 

कार्नी यांचे सरकार आल्यानंतरचा हा पहिली मोठी संधी आहे.  ज्या संधीद्वारे भारत- कॅनडा संबंध सुधारू शकतात. मागच्या कॅनडाच्या सरकारच्या कारकिर्दीत खलिस्तानचे समर्थन केल्याच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. पंतप्रधान मोदी यांची ही भेट , फक्त आंतरराष्ट्रीय मंचावरील भारताची प्रतिमातर उंचावणार आहे, परंतु दोन्ही देशांमधील तणावही दुर करणार आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टद्वारे या परिषदेला जाणार असल्याचे सुतोवाच केले आहे. तसेच दोन्ही देशातील संबंधही सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored