Pimpri Chinchwad City : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांच्या उपसूचनांचा पाऊस पाडला आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधा आणि नामकरणात्या अनेक उपसूचनांना मंजूरी देण्यात आली आहे.
पिंपरी : 21-03-2026
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad City )महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांच्या उपसूचनांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये चिंचवड येथील नियोजित ‘सिटी सेंटर’च्या जागेवर आता ‘अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावासह शहराच्या पायाभूत सुविधा आणि नामकरणाच्या अनेक उपसूचनांना मंजूरी देण्यात आली आहे.
सिटी सेंटरएवजी आता क्रीडा विद्यापीठ सायन्स पार्कसमोरील महापालिकेच्या खाणीच्या जागेत दरवर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सिटी सेंटर’ उभारण्याचा मनोदय अंदाजपत्रकात व्यक्त केला जात असे. मात्र, आता या जागेचा वापर क्रीडा क्षेत्रासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुराधा गोरखे सूचक आणि कुशाग्र कदम अनुमोदक असलेल्या या उपसूचनेनुसार, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ साकारले जाणार आहे.
सांगवीतील वाहतूक कोंडी फुटणार ; पुलाचेही नामकरण (Pimpri Chinchwad City
सांगवी-बोपोडी दरम्यान मुळा नदीवर 60 कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात आला असला, तरी सांगवीतील अरूंद रस्त्यांमुळे त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नव्हता. ही अडचण दूर कऱण्यासाठी शिवसृष्टी उद्यान परिसरातील रस्ता 18 मीटरपर्यंत रुंद करण्याच्या उपसूचनेला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, या पुलाला ‘सरकार शितोळे सेतू’ असे नाव देण्याते निश्चित कऱण्यात आले आहे.
महत्त्वाचे इतर निर्णय (Pimpri Chinchwad City
आरक्षण बदल : पवनानगर, काळेवाडी येथील उद्यानाचे आरक्षण (सर्वे नं. 88 ते 96 ) रद्द करून हे क्षेत्र आता निवासी क्षेत्रात समाविष्ट कऱण्यात आले आहे.
स्मारकासाठी निधी : निगडी प्राधिकरण येथील यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी समितीला 1 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर कऱण्यात आले आहे.
प्रशासकीय सुधारणा : स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या अर्हता व अनुभवात सुसूत्रता आणून ही पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय झाला आहे.
सुशोभीकरण : दापोडी ते पिंपरी मेट्रो मार्गावरील खांबांचे सुशोभीकरण आणि सांगवी फाटा येथील महात्मा फुले उड्डाणपुलावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
थेट प्रक्षेपण : महापालिका सभेचे कामकाज पारदर्शक होण्यासाठी सभागृहातील दोन स्क्रीन सुरू करून सभेचे थेट चित्रिकरण केले जाईल.
नवे नामकरण सोहळे (Pimpri Chinchwad City )
सभेत विविध चौकांचे व शाळांचे नामकरण कऱण्याच्या निर्णय झाला आहे. यामध्ये
1 गोविंद गार्डन चौक (पिंपळे सौदागर) : गोविंद यशदा चौक
2 प्राथमिक शाळा (रहाटणी) : नारायण नढे प्राथमिक शाळा
3. पिंपळे गुरव रस्ते विकास : रस्ते विकासासाठी जागा देणाऱ्या मालकांना योग्य नुकसान भरपाई देण्याच्या प्रस्तावावरही शिक्कामोर्तब कऱण्यात आले.