Translate :

Sponsored

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building In Pimple Saudagar

पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि प्रखर ज्वाळांमुळ जवानांना आत प्रवेश करताना खुप अडचणी आल्या. तरीही अग्निशमन दलाने तत्परता दाखवली. जाणून घेऊ संपूर्ण घटनाक्रम.

पुणे : 02/12/2025

पिंपळे सौदागर (Pimple Saudagar Fire Incident) येथील कुणाल आयकॉन रोडवरील प्राईम स्क्वेअर या बहुमजली कमर्शियल इमारतीतील चौथ्या मजल्यावरील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये दुपारी सुमारे पावणे तीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररुप धारण केेले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पिपंरी मुख्य केंद्रातून 2, थेरगाव उपक्रेंद्रातून 1 आणि नेहरूनगर केंद्रातून 1 अशा चार अग्निशमन पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले.

इमारतीच्या आत दाट धूर आणि प्रखर ज्वाळांमुळे जवानांना आत प्रवेश करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. तहीही धाडस आणि तत्परता दाखवत पथकाने पाचव्या मजल्यावर अडकवलेल्या सहा जणांना सुरक्षित बाहेर काढले. चौथ्या मजल्यावरील कोचिंग क्लालमध्ये एकूण 42 विद्यार्थी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी त्वरीत 101 वर कळविले आणि अग्निशमन दलाने अल्पावधीत दाखवलेल्या तत्परतेने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

कारवाईदरम्यान वरिष्ठ अधिकारी ऋषिकांत चिपाडे, उपअग्निशमन अधिकारी विनायक नाळे, गौतम इंगवले, प्रभारी अधिकारी रूपेश जाधव, वाहनचालक मयूर कुंभार, विशाल बानेकर, दत्तात्रय रोकडे, मारूती गुजर तसेच महिला कर्मचारी स्नेहा जगताप आणि इतर जवानांनी सहभाग घेत पूर्ण क्षमतेने आग विझवण्याचे कार्य केले. अशा कोणत्यांही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तत्काळ 101 वर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.

अग्निशमन विभागाची तत्परता उल्लेखनीय  (Pimple Saudagar Fire Incident)

पिंपळे सौदागर येथील घटनेत स्थानिकांनी आणि अग्निशमन विभागाने दाखवलेली तत्परता ही कौतुकास्पद आहे. दलाने दाखवलेले धैर्य आणि संयम उल्लेखनीय आहे.

      –   विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

संभाव्य नुकसान मोठे होण्याची शक्यता होती  (Pimple Saudagar Fire Incident )

या आगीत संभाव्य नुकसानीची व्याप्ती खुप मोठी होती. अन्य व्यावसायांतील गर्दी किंवा शेजारच्या इमारतींमध्ये आग पसरली असती तर नियंत्रण ठेवणे कठिण झाले होते. आमचे पथक काही मिनिटांत रवाना झाले आणि पूर्ण क्षमतेने काम केले. पिंपळे सौदागर परिसरात स्वतंत्र अग्निशमन केंद्राची नितांत आवश्यकता असून, याबाबत तातडीची कार्यवाही होणे आवश्यक आहे.

        – ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी,पिंपरी चिंचवड महापालिका

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored