Translate :

Sponsored

Parth Pawar Vs Anjali Damaniya, Big News : पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणात अंजली दमानिया करणार गौप्यस्फोट : Anjali Damaniya Criticizes Ajit And Parth Pawar Pune land Scam

पार्थ पवार जमीन प्रकरणात अंजली दमानिया करणार गौप्यस्फोट

Parth Pawar Vs Anjali Damaniya : पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडालेली पहायला मिळाली. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले आहे.

पुणे : 18/11/2025

पुण्यातील जमीन प्रकरणामुळे पार्थ पवार चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर याबाबत गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणाच्या दरम्यान आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Parth Pawar Vs Anjali Damaniya ) यांनी आक्रमक भूमिका घेत काही दावे केले आहेत. त्या मुंडवा येथील वादग्रस्त जमिनीची पाहणी कऱण्यासाठी गेल्या असता त्यांना प्रवेशद्वारावरच थांबविण्यात आले. यामुळे संतप्त दमानिया यांनी अधिकाऱ्यांवर उद्धटपणाचा आरोप करत थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, उद्या पत्रकार परिषद घेऊन ” मोठा गौप्यस्फोट” करणार आहे.

काय म्हणाल्या दमानिया ?  ( Parth Pawar Vs Anjali Damaniya )

” मी माहिती घेण्यासाठी आले होते, पण बॉटनिकल सर्व्हेचे अधिकारी अत्यंत उद्धटपणे वागत होते. दोनजणांना आत जाऊन पाहणी करण्याची परवानगी नाकारली. 16 जूनला काही लोकांनी येथे येऊन तमाशा केला होता, ते कोण होते याची माहिती घेण्याचा माझा प्रयत्न होता. “

त्या पुढे म्हणाल्या, अजित पवारांना व्यवहार रद्द कऱण्याचा अधिकार नाही. दोन लोकांनी फ्रॉड केला असेल तर कायदेशीर तपास व्हायला हवा. हा व्यवहार पंतप्रधानांनाही रद्द करता येणार नाही. क्रिमिनल लायबिलिटी तपासल्याशिवाय व्यवहार रद्द करता येत नाही. हा व्यवहार रद्द केला तर मी कोर्टात आव्हान देईन.” या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात तणाव वाढला असून उद्याच्या पत्रकार परिषदेतवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेडिया कंपनीला 24 नोव्हेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत  (Parth Pawar Vs Anjali Damaniya)

पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला म्हणणे मांडण्यासाठी आता 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच 24 नोव्हेंबरला अमेडिया कंपनीला म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात आल्याचे माहिती सह-जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी दस्तखरेदीवेळी मुद्रांक शुल्क बुडवल्याने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने 42 कोटींच्या नोटिशीवर कंपनीने 14 दिवसांची मुदत मागितली होती. पण मुद्रांक शुल्क विभागाने कंपनीला केवळ सात दिवसांची मुदत दिली आहे. अमेडिया कंपनीचे दिग्विजयसिंह पाटील यांनी शीतल तेजवानी यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी करून जमीन खरेदी केली. ही जमीन सरकारी मालकीची होती. जमीन खरेदीवेळी या जागेवर डेटा सेंटर उभारण्यात येणार असल्याता दावा करत उद्योग विभागाकडून इरादापत्र प्राप्त कऱण्यात आले.त्यानंतर पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीने 42 कोटी रुपयांचे शुल्क बुडवल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored