Translate :

Sponsored

Parth Pawar Land Scam, 2025, Breaking news : पार्थ पवार-अजित पवार यांच्यावरचे टेन्शन वाढणार का ? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? जाणून घ्या जमीन घोटाळा प्रकरण : Parth Pawar-Ajit Pawar tension will Increase

पार्थ पवार यांच्या कंपनी घोटाळा प्रकरणात कारवाईचे फडणवीसांचे संकेत

Parth Pawar Land Scam : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद राज्यभर पसरले आहे. याबाबत आता अजित पवारांसह पार्थ पवारांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. जाणून घेऊयात या संपू्र्ण जमीन घोटाळा प्रकरणाविषयी.

पुणे : 08-11-2025 

पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव आल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपूर्ण प्रकरणाविषयी कायम म्हणाले फडणवीस (Parth Pawar Land Scam)

” या प्रकऱणात दोन्ही पक्षांनी संबंधित रजिस्ट्री रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यामुळे दाखल गुन्हेगारी प्रकरण संपणार नाही. तपासादरम्यान ज्या अनियमितता आढळतील, त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. माझ्या या मताशी श्रीमान मुख्यमंत्री अजित पवार देखील पूर्णपणे सहमत असतील. अहवालात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या वक्तव्यानंतर बोपोडी जमीन प्रकरणावर पुढील घडामोडींना वेग येण्याती शक्यता आहे.

विखेपाटलांनी केली पवारांची पाठराखण  (Parth Pawar Land Scam)

एकीकडे फडणवीसांनी कारवाईचे संकेत दिले असताना दुसरीकडे मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. अजित पवारांनी तेव्हाच थांबवलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, पण बऱ्याचदा कामाच्या व्यापात अशा गोष्टी रागून जातात.अनेक निर्णय परस्पर घेतले जातात. पण आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यानुसार त्यांची चौकशी होऊ द्यावी. पण अजित पवार यांचा राजीनामा मागण्यापेक्षा चौकशीनंतर जे वास्तव समोर येईल, तेव्हा जे मागायचं आहे ते मागा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.

अजित पवारांनी घेतला यु-टर्न (Parth Pawar Land Scam)

विशेष म्हणजे अजित पवारांनी या संपूर्ण प्रकरणात एका वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे. जमीन घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर 6 नोव्हेंबरला अजित पवार यांनी,माझा त्या गोष्टींशी दुरान्वये संबंध नाही. मागे तीन-चार महिन्यांपूर्वी मला या गोष्टी कानावर आल्या होत्या, पण असं काहीही चुकीचं केलेले मला चालणार नाही, अशा चुकीच्या गोष्टी करू नका, असं मी स्पष्टपणे त्यांना सांगितले होते. असं अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांना या जमिन गेैरव्यवहाराची आधीपासूनच माहिती होती. अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. मात्र दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी आपलेच हे वक्तव्य नाकारत ” आजपर्यंतच्या 35 वर्षांच्या कार्यकाळात मी राजकीय जीवनात कधीही नियम सोडून काम केलं नाही. 2009-10 मध्येही माझ्यावर आरोप झाले होते. पण ते आरोप सिद्ध झाले नाहीत. असंही त्यांनी पुढे नमूद केले आहे.

काय आहे जमीन घोटाळा प्रकरण  (Parth Pawar Land Scam)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. सुमारे 1804 कोटी रूपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटींना खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. नियमानुसार या खेरदीवर 21 कोटी रूपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागले असताना, फक्त 500 रूपयांवर व्यवहार पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. विरोधकांनी या प्रकरणावर टिकेची झोड उठवत सरकारवर ” प्रशासनाचा गैरवापर करून जमीन व्यवहार कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न” झाल्याचा आरोप केला आहे. अमेडिया होल्डिंग्ज एलएलपीमध्ये पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी असल्याने संशयाची सुई थेट त्यांच्यावर आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored