Translate :

Sponsored

Parth Pawar Land Controversy, Breaking News : अजित पवारांना झटका कॉंग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप ! : Pune Land Controversy Of Parth Pawar Father Ajit Pawar Shocked Congress Attack On Sharad Pawar

पुणे जमीन घोटाळा प्रकरणात शरद पवारांवरही कॉंग्रेस वरिष्ठ आरोप करत आहेत.

Parth Pawar Land Controversy : पुण्यातील जमिनीच्या वादामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. विशेषतः विरोधी पक्ष महाविकास आघाडी (MVA) मध्ये फूट पडली आहे. आता महाराष्ट्राचे राजकारण काय वळण घेते हे पहाणे उत्सूकतेचे ठरणार आहे.

पुणे : 10/11/2025

पुण्यातील जमीन खरेदीचा वाद (Parth Pawar Land Controversy) थांबवण्याएवजी वाढतच चालला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या कंपनीत सहभाग असल्याने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी स्वतः सांगितले की, या प्रकरणाची माहिती ऐकूण त्यांना धक्का बसला. त्यांनी असेही म्हटले की, हे कसे घडले हे त्यांना अजूनही समजू शकत नाही. दरम्यान, या प्रकरणामुळे विरोधी महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण झाला आहे. कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. या संपू्रण प्रकरणात कॉंग्रेस पक्षाला कट रचल्याचा वास येऊ लागला आहे.

वरिष्ठ नेत्यांचा शरद पवारांवर आरोप (Parth Pawar Land Controversy)

पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने शरद पवारांवर महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष कमकुवत केल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख सहयोगी उद्धव ठाकरे यांच्याकडे काय पर्याय आहे ? महाविकास आघाडीतील कलहात उद्धव ठाकरे आता काय करतील ? विशेष म्हणजे पार्थ हा शरद पवारांचा नातू आहे. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीवर पुण्यात 1,800 कोटी रूपयांची सरकारी जमीन कमी किंमतीत मिळवल्याला आरोप आहे. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जमीन ज्या पद्धतीने नोंदणीकृत करण्यात आली त्यामुळे त्यांना धक्का बसला आहे.

पार्थ पवारांचे नाव आले पुढे (Parth Pawar Land Controversy)

पुण्यातील मुंढवा परिसररातील 40 एकर सरकारी जमिनीसाठी पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनी अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीने 300 कोटी रूपयांचा करार केल्याने राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी या करारावर धक्का व्यक्त केला आणि म्हटले की, स्टॅम्प ड्युटीचा एक पैसाही न भरता नोंदणी कशी झाली हे समजण्यासारखे नाही. ते म्हणाले, ” हे कसे घडले आणि रजिस्ट्रार कार्यालयातील व्यक्तीने ते कसे मंजूर केले हे मला समाजत नाही.”

महाविकास आघाडीत गोंधळ का आहे ? (Parth Pawar Land Controversy)

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री प्रकरण अजित पवारांशी जोडलेली आहे. ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यामुळे सत्ताधारी आघाडीत फूट पडायला हवी होती. मात्र उलट घडले आहे. विरोधी महाविकास आघाडीत फूट पडली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडीतील मुख्य घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पवार महाराष्ट्रात कॉंग्रेसला कमकुवत करण्याचा कट रचत आहेत असा त्यांचा दावा आहे. पुणे जमीन वादावर पवार कॉंग्रेस जितकी आक्रमक भूमिका घेत आहेत तितकी आक्रमक भूमिका घेत नाहीत असा पटोले यांचा दावा आहे. पुणे जमीन वाद प्रकरणात आरोपांना सामोरे जाणारे पार्थ हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored