Ajit Pawar Meet Devendra Fadanavis : पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. यानंतर आता राजकीय क्षेत्रात कोणता भूकंप येणार याची सर्वांना उत्सूकता आहे. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
मुंबई : 07/11/2025
उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कंपनी (Parth Pawar Company Scam) एका जमिनीच्या व्यवहारांमध्ये अडकली आहे. कोट्यावधींची जमीन कमी किंमतीमध्ये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी अगदी 500 रूपयांचा स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवारांवर कोंडीत पकडले आहे. या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीतून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पार्थ पवार यांच्या कंपनीचा जमीन घोटाळा (Parth Pawar Company Scam)
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनी अमेडिया संबंधित एक आर्थिक व्यवहार घोटाळा प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्व फडणवीस यांनी देखील कारवाई केली आहे. या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटी रूपयांत विकलेल्या प्रकरणाची माहिती समोर आली आहे. या जमीन व्यवहारात गैरप्रकार झाले असून केवळ 500 रूपयांच्या स्टँपड्यूटीवर हा व्यवहार झाल्याचं निर्दशनास दिसून येत आहे. यावरून विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे.
पारदर्शक पद्धातीने चौकशी व्हावी (Parth Pawar Company Scam)
या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री असल्याने, हा तपास योग्य पद्धतीने होईल का ? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. नैतिकतेच्या जोरावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे या सर्व विरोधी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार – देवेंद्र फडणवीस भेट (Parth Pawar Company Scam)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. दोन्ही नेत्यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट झाली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीबाबत हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्याची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण काय वळण घेते याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.