Pankaja Munde PA Anant Garje Wife : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी राहत्या घरात स्वतःला संपवले. आता गौरी यांच्या कुटुंबियांनी अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनंत गर्जेसह तीनजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई : 23/11/2025
पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेेची पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे (Pankaja Munde PA Anant Garje Wife) यांनी छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी मुंबईतील रहात्या घरी आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याता दावा गौरी यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये सतत भांडण होत होते. अखेर या सगळ्याला कंटाळून गौरीने काल स्वतःला संपवले. आता या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
गौरीच्या वडिलांनी दिला जबाब (Pankaja Munde PA Anant Garje Wife)
गौरीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गौरीला आत्महत्येपूर्वी अनंत गर्जेच्या आधीच्या पत्नी किरणच्या गर्भवती असल्याची कागदपत्रे मिळाल्याने ती अस्वस्थ होती. ती कागदपत्रे तिने आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांचा जबाब आहे. वडिलांच्या जबाबानंतर डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दिरावर गुन्हा दाखल झाला आहे. गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास दिला जात होता. आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.
तिघांवर गुन्हा दाखल (Pankaja Munde PA Anant Garje Wife)
अनंत गर्जे, शीतल आंधळे, दीर अजय गर्जे हे माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहे. अनंत गर्जे हा गौरीने आत्महत्या केली असं सांगत असला तरी, ही आत्महत्या आहे की घातपात आहे याची चौकशी व्हावी. वरील तीन लोकांविरोधात माझी तक्रार आहे, असे गौरीच्या वडिलांनी पोलिसांना स्टेटमेंट दिले आहे. त्यानंतर गौरीचा पती अनंत गर्जे, नणंद शीत गर्जे-तांदळे आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. वरळी पोलीस ठाण्यात तिघांवर बीएनएस कलम 108,85,352,351 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला.