पल्लवी जोशी (Pallavi Joshi )हिने कान्स (Cannes Film Festival ) फिल्म फेस्टिवल मध्ये पहिल्यांदाच हजेरी लावली आहे. तन्वी द ग्रेट या सिनेमाला जे प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे, हे माझ्यासाठी फार भावूक करणारे आहे अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
फ्रान्स : 2025-05-22
पल्लवी जोशी (Pallavi Joshi ) हे नाव मराठी, हिंदी फिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीला नवीन नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेती ही अभिनेत्री कायम उत्कृष्ट भूमिका साकारताना आपण पाहिले आहे. अनेक वर्ष या क्षेत्रात काम करून आता पल्लवी जोशी यांनी पहिल्यांदाच कान्स (Cannes Film Festival ) सारख्या मानाच्या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावून आपल्या आजवरच्या करियरमध्ये आणखी महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
यावर्षीच्या 2025 कान्स फिल्म फेस्टिवल (Cannes Film Festival) मध्ये पल्लवी जोशी (Pallavi Joshi ) ने तन्वी द ग्रेट या चित्रपटासाठी हजेरी लावली आहे. या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, तन्वी द ग्रेट या सिनेमाच्या स्क्रिनींगला जे प्रेम आम्हाला मिळाले आहे, त्याने मी भारावून गेले आहे, भावूक झाले आहे. या सिनेमातील प्रत्येक पात्राचे खुप कौतुक केले जात आहे, हा चित्रपट वेगवेगळ्या संस्कृती आणि भाषेच्या लोकांना आवडत आहे.
पल्लवी जोशी (Pallavi Joshi ) यांनी असेही सांगितले आहे की, मला या चित्रपटाचा भाग व्हायला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. आता सर्वत्र हा चित्रपट कधी दाखवला जातो याची उत्सुकता आहे. अनुपम खेर यांचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादासाठी त्यांनीही सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी त्यांच्या इन्साग्राम अकाऊंट वरून त्याविषयीची एक पोस्ट लिहिली आहे. हा चित्रपट 18 जुलै ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.