Nobel Prize 2025 : यावर्षीच्या वैद्यकीय विभागातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नोबेल पुरस्कार 2025 मध्ये फिजियॉलॉजी(मेडिसीन) मध्ये अमेरिकेच्या ‘मेरी ई. ब्रंकॉ’, ‘फ्रेड राम्सडेल’ आणि जपान च्या ‘शिमोन सकागुची’ यांना पेरिफेरल इम्यून टॉलरेंसच्या शोधासाठी जाहीर करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय : 06/10/2025
नोबेल पुरस्कार देणाऱ्या संस्थेने 2025 चे नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. यातील एक नाव अमेरिकेतील सुद्धा आहे. मात्र ते नाव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नसून, मेडीसीनमधील एका शास्रज्ञाचे आहे. फिजियॉलॉजीच्या क्षेत्रातील अमेरिकेतील मैरी ई. ब्रंकॉ, फ्रेड राम्सडेल आणि जापानच्या शिमोन सकागुची यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आले आहे. स्टॉकहोम स्थित कारोलिंस्का इंस्टीट्यूटने सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली.
या वैज्ञानिकांना हा पुरस्कार पेरिफेरल इम्युन टॉलरेंस म्हणजे शरीराच्या बाहेरील भागाची प्रतिकारशक्तीच्या क्षमतेशी निगडीत शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देेण्यात आला आहे. हा शोध इम्यून सिस्टीमविषयी समजून घेण्यासाठीचा महत्ताचा शोध मानन्यात येत आहे. नोबेल पुरस्कारार्थींची इतर नावे अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
कोणत्या शोधासाठी मिळाला हा पुरस्कार ? (Nobel Prize 2025 )
आपली रोगप्रतिकारकशक्ती सर्वसाधारणपणे आपल्या शरीराचे संरक्षण बाहेरच्या बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते. परंतु कधी कधी ही प्रतिकारशक्ती चुकून आपल्याच शरीरावर हल्ला करते. या स्थीतीला ऑटोइम्यून हा आजार म्हणतात. उदाहरणार्थ रूमेटॉईड आर्थराईटस, टाईप-1 डायबिटीज आणि ल्यूपस. याआधी असे मानले जात होते की, इम्यून सेल्स शरीराच्या आतच काहीसे क्षमाशील होतात, ज्याला वैद्यकीय भाषेत सेंट्रल इम्यून टॉलरेंस म्हटले जाते. मात्र आता या नोबल विजेत्यांनी हे सिद्ध केले आहे की, शरीराच्या बाहेरील भागांमध्येही एक नियंत्रित करणारी यंत्रणा आहे, ज्याला पेरिफेरल इम्यून टॉलरेंस असे म्हटले जाते.
1990 च्या दशकामध्ये सुरू करण्यात आलेल्या या संशोधनात वैज्ञानिकांनी ‘रेगुलेटरी टी सेल्स’ (Tregs) नावाच्या विशेष कोशिका शोधून काढल्या होत्या. ज्या प्रतिकारशक्तीला (इम्यून सिस्टीम) संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. जेव्हा या विशेष कोशिका नीट काम करत नाहीत, तेव्हा शरीराच्या इतर भागांवर त्या हल्ला करण्यास सुरूवात करतात. हा शोध फार महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक आजारांवर उपचारांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. फक्त ऑटोइम्यून आजारांवरच नाही तर, कँंन्सर, ॲलर्जी आणि अवयव प्रत्यारोपण (ट्रांसप्लांट) सारख्या क्षेत्रांमध्ये उपचार करण्यासाठी नवीन मार्ग सापडण्यास या शोधाची मदत होणार आहे.
‘ट्रम्प’ ला मिळणार का नोबेल ? (Nobel Prize 2025)
फेब्रुवारी 2025 मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रपती झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, त्यांनी सात बराच काळ चालणारे युद्ध संपवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. ज्यात, भारत-पाकिस्तान, कंबोडिया-थायलंड, अर्मेनियाई-अजरबैजानी, इज्राईल-ईराण या देशांमधील युद्धांचा समावेश आहे. त्यांच्या या दाव्यांवर अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे. भारत-पाकिस्तान संघर्षात भारताने ट्रम्पच्या या भूमिकेचा आणि वक्तव्याला नाकारले होते. मात्र पाकिस्तानने त्यांना याचे श्रेय दिले. कंबोडीया-थायलंड मधील वाद मलेशियामुळे मिटला होता. यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती. इज्रायल आणि ईराण मधील वाद मिटवण्याबाबत ट्रम्प यांचे विधान विवादास्पद आहे. कारण अमेरिकेनेच ईराणवर बॉम्ब टाकले होते. ईराण युद्ध संपवण्याचे श्रेय कतार आणि मिस्र या देशांना देतो. अशा परिस्थीतीत ट्रम्पला नोबल मिळणे विवादास्पद ठरणार आहे.