Translate :

Sponsored

Nitish Kumar, Breaking News Bihar : पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या हाती बिहारची सत्ता, एनडीए विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजूरी : Nitish kumar Will be The Cheif Minister Of Bihar Again

बिहारची सत्ता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्याच हातात.

Nitish Kumar : नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित झाले आहे. 20 नोव्हेंबर ला नितीश कुमार 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. जाणून घेऊयात अधिक माहिती.

बिहार : 19/11/2025

बिहारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीबाबत सर्वत्र उत्सुकता होती. ही उत्सूकता आता संपली आहे. जेडीयू विधिमंडळ पक्षाने नितीश कुमार (Nitish Kumar) यांची नेतेपदी निवड केली आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळात अनेक नवीन  नावांची चर्चा सुरू होती. गेल्या वेळी, भाजपने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्या जागी सम्राट चौधरी यांना विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री नियुक्त करून सर्वांना आश्चर्यचकित केले. एक प्रकारे भाजपने अनधिकृतपणे विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा नियुक्त केले आहे.

नितीश कुमार (Nitish Kumar)हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यांना एकमताने विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले. 20 नोव्हेंबर रोजी नितिश कुमार 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. याआधी, नितीश राजभवन येथे राजीनामा देतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी, जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक झाली,तिथे त्यांना नेते म्हणून निवडण्यात आले. भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे नितीश कुमार यांच्या नवीन सरकारमध्ये उपमुख्यंत्री असतील. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नितीश कुमार हे बिहारचे 19 वे मुख्यमंत्री (Nitish Kumar)

नितीश कुमार हे बिहारचे 19 वे मुख्यमंत्री असतील. सध्याची विधानसभा आज बरखास्त होणार आहे. नवीन सरकारची शपथविधी उद्या पाटण्यातील गांधी मैदानावर होणार आहे. शपथविधी सोहळा सकाळी 11 ते दुपारी 12:30 दरम्यान होईल. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक एनडीए नेते उपस्थित राहणार आहेत.

22 नोव्हेंबरला संपणार कार्यकाळ (Nitish Kumar)

बिहार विधानसभा कार्यकाळ 22 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन होणे आवश्यक आहे. म्हणून नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडे भाजप कोट्यातील 15-16 मंत्री असण्याची शक्यता आहे. जेडीयूकडे एक मुख्यमंत्री आणि 14 मंत्री असण्याची अपेक्षा आहे. चिराग पासवान यांचे तीन मंत्री देखील शपथ घेण्याती शक्यता वर्तवली जात आहे. मांझी आणि कुशवाहा यांच्याकडे प्रत्येकी एक मंत्री असू शकतो.

बिहार निवडणुकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय (Nitish Kumar)

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने प्रचंड विजय मिळवला. त्यांना सर्वाधिक म्हणजे 100 पैकी 89 जागा मिळाल्या आहेत. जेडीयुने 100 जागा लढवल्या. पण त्यांनी 85 जागा जिंकल्या.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored