Translate :

Sponsored

New Labour Code India, 2025, Good News : देशात नवीन कामगार संहिता लागू, वेळेवर पगार, समान वेतन आणि सामाजिक सुरक्षेची 40 कोटी कामगारांना मिळणार हमी : New labour Code Implemented In the Country

देशातील कामगारांसाठी आता नवीन कामगार संहिता लागू करण्यात आली आहे.

New Labour Code India : देशातील कामगार व्यवस्थेतील हा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल आहे, ज्यामुळे कामगारांच्या जीवनमानात चांगला बदल होणे अपेक्षित आहे. यामुळे कामगारांना त्यांचे हक्क मिळणार तर आहेच, पण त्यांना ते सहजरित्या साध्य होणार आहेत. जाणून घेऊ अधिक माहिती.

दिल्ली : 21/11/2025

देशातील श्रम आणि रोजगार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा करत सरकारने शुक्रवारी चार नवीन कामगार संहिता (New Labour Code India,) अधिकृतपणे लागू केल्या आहेत. देशातील कामगार व्यवस्थेतील हा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल आहे, ज्यामुळे शोषण थांबेल आणि कामगारांना त्यांचे हक्क अधिक प्रभावीपणे मिळतील. या नवीन श्रम संहितांमुळे आता कामात होणारा विलंब, मनमानी आणि कामगारांचे शोषण थांबणार आहे. प्रत्येक कामगाराला त्याचे हक्क आणि सुरक्षा मिळणार आहे.

काय आहेत नविन संहितेमुळे मिळणाऱ्या हमी ?  (New Labour Code India )

  • 1 किमान वेतन : सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची (Minimum Wage ) कायदेशीर हमी
  • 2 नियुक्ती पत्र : तरूणांना नोकरीच्या सुरूवातीलाच नियुक्ती पत्र (Appointment Letter ) देणे बंधनकारक
  • 3 समान वेतन : महिलांना समान वेतन (Equal Pay) आणि कार्यस्थळावर सन्मानाची हमी
  • 4 सामाजिक सुरक्षा : देशभरातील 40 कोटी असंघटित आणि संघटित कामगारांना सामाजिक सुरक्षेची (Social security ) हमी .
  • 5 ग्रॅज्युईटी : फिक्स टर्म एम्प्लॉईजना (Fixed Term Employees ) फक्त एक वर्षानंतर ग्रॅज्युइटीची हमी
  • 6 आरोग्य तापसणी : 40 वर्षांवरील कामगारांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची (Health Check-up) हमी.
  • 7 ओव्हर टाइम : निश्चित वेळेपेक्षा जास्त काम केल्यास दु्प्पट वेतन (Double Pay) देण्याची हमी
  • 8 धोकादायक क्षेत्र : खान, केमिकल युनिटस आणि अन्य जोखमीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना 100 टक्के हेल्थ सिक्युरिटी हमी .
  • 9 सामाजिक न्याय : आंतरराष्ट्रीय मानांकानुसार कामगारांना सामाजिक न्याय मिळण्याची हमी

पंतप्रधान मोदींनी मांंडली भूमिका  (New Labour Code India )

पंतप्रधान मोदी यांनी या बदलांवर आपली भूमिका सोशल मीडियावर एक्सच्या माध्यमातून मांडली आहे.

ते म्हणाले आहेत की, ” आज, आमच्या सरकारने चार लेबर लागू केले आहेत. स्वातंत्र्यांनंतरचे हे सर्व मोठे आणि प्रगतीशील कामगार-केंद्रीत सुधारणांपैकी एक आहे. यामुळे आमच्या कामगारांना मोठे बळ मिळते. हे नियम कप्लांयस (Compliance) देखील खूप सोपे करतात आणि ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ (Ease Of Doing Business ) ला प्रोस्ताहन देतात. हे कोड सामाजिक सुरक्षा, वेळेवर आणि पुरेसा पगार, सुरक्षित कामाची जागा आणि विशेषतः नारी शक्ती व युवा शक्तीसाठी चांगल्या संधींसाठी मजबूत पाया म्हणून काम करतील.”

केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनीही एक्स वर पोस्ट करत , ” मोदी सरकारची हमी, प्रत्येक श्रमिकाचा सन्मान ! आजपासून देशामध्ये नवीन श्रम संहिता लागू झाल्या आहेत…” असे सांगितले.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored