NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकऱणात पुण्याच्या मॉडर्न क़ॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना सीबीआयकडून अटक झाली आहे. एनटीएच्या प्रश्नपत्रिका समितीच्या सदस्य असलेल्या मांढरे यांनी पेपर लीक केल्याचा आरोप आहे.
पुणे : 18-05-2026
पुणे जिल्ह्यातील मॉडर्न महाविद्यालयातील कनिष्ठ विभागात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक मनीषा मांढरे या 2002 पासून इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्र विषय शिकवतात. त्यांच्या अनुभवाच्या आधारे नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत नीट परिक्षेच्या काही गोपनीय कामकाजासाठी त्यांची नियुक्ती कऱण्यात आली होती. पण आता नीटच्या पेपरफुटी प्रकऱणात (NEET Paper Leak Update) त्यांचा सहभाग आढळून येत आहे.
मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉ.निवेदिता एकबोटे यांची भूमिका (NEET Paper Leak Update)
महाराष्ट्रातील खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या अटी) नियमावली 1981 (एमईपीसी) अंतर्गत मनीषा मांढरे यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती सोसायटीचे कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख आणि प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी दिली आहे.
शिकवलेले प्रश्न परीक्षेत (NEET Paper Leak Update)
मनीषा मांढरे या नीट युजी प्रक्रियेत सहभागी होत्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सिने त्यांना तज्ञ म्हणून नेमले होते. त्यांना वनस्पतीशास्र आणि प्राणीशास्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांची माहिती होती. त्यांनी एप्रिल 2026 मध्ये आरोपी वाघमारे यांच्या माध्यमातून नीटच्या उमेदवारांना त्यांच्या पुण्यातील घरात गोळा करून शिकवणी वर्ग घेतला होता. या वेळी संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांना वहीत लिहून घेण्यास सांगितले होते. त्यापैकी बहुतांश प्रश्न हे तीन मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळत होते.
जीवशास्राच्या पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक (NEET Paper Leak Update)
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी नीट पेपरफुटीप्रकरणी जीवशास्राच्या पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक केली होती. मनीषा मांढरे नीट यूजी’ च्या प्रश्नपत्रिका निर्मीती समितीच्या सदस्य होत्या. सूत्रधार प्रा.पी.व्ही. कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या चौकशीच्या आधारे ही अटक कऱण्यात आली आहे.