Translate :

Sponsored

NCERT Books, New Information, Mughal History Controversy Class 8 Book Changes : ‘एनसीईआरटी’ च्या आठव्या इयत्तेच्या इतिहासाच्या पुस्तकात नवीन धडे, मुघल शासकांविषयी काय लिहिले आहे ? जाणून घ्या.

NCERT Books : नॅशनल काऊंन्सिल ऑफ एज्युकेशनल  रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग ( NCERT ) च्या आठव्या इयत्तेच्या पुस्तकात मुघल सम्राटांच्या शासनकाळाविषयी वर्णन करताना काही नविन माहिती अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. 

दिल्ली : 16/07/2025

आजपर्यंत शालेय पाठ्य पुस्तकात इतिहास ज्या दृष्टिकोनातून शिकवला जात होता, तो दृष्टिकोन आता बदलला जात असल्याचे दिसून येत आहे. नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग (NCERT) च्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात नवी सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात भारतीय इतिहासाविषयीचा नविन दृष्टिकोन दिला जात आहे. मुघल शासकांच्या कार्यकाळावर हे पुस्तकं आहेत. या पुस्तकात बाबर हा ‘निर्मम विजेता’, औरंगजेब हा ‘धार्मिक असहिष्णु सैन्य शासक’, तर अकबर हा ‘ क्रुर आणि सहिष्णुततेचे मिश्रण असणारा शासक होता, असे सांगण्यात आले आहे. या नविन धड्यांमधील मजकुरामुळे मुगलांच्या कार्यकाळावर टिका तर करण्यात आलेली आहेच, मात्र  त्यांच्या विषयीची प्रतिरोध आणि भारताच्या विविधतेवरील एकतेच्या दृष्टिकोनाविषयीचा नविन आयाम समोर आणत आहेत. 

काय आहे या नविन पुस्तकात (NCERT Books )

‘एक्सप्लोरिंग सोसाईटी: इंडिया एंड बियॉन्ड’ नावाच्या या पुस्तकात एनसीईआरटीचा नविन अभ्यासक्रम (NCFSE 2003) नविन रुपरेखेनुसार मांडण्यात आला आहे. यात मुघलांसह, मराठा आणि शिखांच्या शासनकालखंडावर नव्या संदर्भासह भाष्य केले आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलच हे नमुद करण्यात आले आहे की, इतिहासातील घटनांकडे आजच्या काळाच्या नजरेतून पहाणे योग्य नाही. मात्र त्याच्याकडे निष्पक्षपणे समजणे आवश्यक आहे. इतिहासातील क्रूर शासनकाळाला विद्यार्थ्यांनी समजून घेणे, आवश्यक आहे. ते समजून घेण्याने विद्यार्थ्यांमध्ये विवेकशील विचार निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. नविन पुस्तकात इतिहासाची दुसरी बाजू मांडण्यात आली आहे.

बाबर ते औरंगजेब (NCERT Books )

पुस्तकात बाबर हा निर्मम आक्रमणकारी होता असे म्हटले आहे. ज्याने अनेक शहरांमधील नागरिकांची निरंकुश हत्या केली. अकबराविषयीही या पुस्तकात म्हटले आहे की, चित्तोडगढच्या 30, 000 नागरिकांचा नरसंहार करण्याचा आदेश दिला होता आणि प्रशासनामध्ये गैर-मुस्लिमांना सीमित भागीदारी देण्यात येत असे. तसेच औरंगजेबाला मंदिरं आणि गुरूद्वारांना नष्ट करणारा शासक म्हणून नमूद करण्यात आले आहे. ज्याने गैर-मुस्लिमांवर जिझिया कर थोपवला, जो ‘धार्मिक असहिष्णुता’, आणि वित्तीय दबाव यांचे प्रतिक होता. असे अकबराचे वर्णन केले आहे. 

प्रतिकार करणाऱ्या नायकांना मिळाली आहे पुस्तकात जागा (NCERT Books )

या पुस्तकात पहिल्यांदा राणी दुर्गावती, महाराणा प्रताप, ताराबाई, अहिल्याबाई होळकर, शिवाजी, जाट शेतकरी, भिल्लं आणि अहोम राजांचा संघर्ष प्रामुख्याने नमुद करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त कुशल रणनीतिकार म्हंटलेले नाही, तर त्यांना धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन असणारे प्रशासक म्हणून संबोधण्यात आले आहे. ज्यांनी मंदिरांचेही पुनर्निमाण केले. 

 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored