Navaratra Utasav 2025 : हिंदू धर्मातील उत्सवांपैकी एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र. या काळात नऊ दिवस देवीची उपासना केली जाते. भारताच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धती दिसून येतात. महाराष्ट्रात घटस्थापना करून हे नऊ दिवस देवीची अराधाना केली जाते. यावर्षी कधी आहे घटनस्थापना आणि त्याचा विधी हे जाणून घेऊयात.
Table of Contents
घटस्थापना,शारदीय नवरात्र उत्सव 2025 (Navaratra Utasav 2025 )
यावर्षी 22 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात होत आहे. यादिवशी प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीचे व्रत (Navaratra Utasav 2025) करून देवीची पूजा केली जाते. घटस्थापना म्हणजे कलश स्थापना करून देवीच्या उपासनेला सुरूवात केली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक घराची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते. मुख्यतः घटाची किंवा कलशाची स्थापना करून या उत्सवाला सुरूवात होते. यावर्षीची घटस्थापना कशी कराल ? काय साहित्या लागते त्यासाठी हे आपण जाणून घेऊयात.
घटस्थापनेसाठी काय साहित्य आवश्यक असते ? (Navaratra Utasav 2025 )
नवरात्रीत घटस्थापना करण्यासाठी देवीची मूर्ती किंवा चित्र, मातीचे लहान मडके (कलश) विविध प्रकारची धान्ये, लहान काथ्यांची टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, तांदुळ अक्षताम्हणून, आंब्याची डहाळी, पैशांचे नाणे, लाल कापड, विड्याची पाने,शेंदुर, हळद-कुंकू, फुले असे सर्व पूजेचे साहित्य गरजेचे असते.
कशी कराल घटस्थापना ? (Navaratra Utasav 2025 )
नवरात्रीत घटस्थापना ( Navaratra Utasav 2025 ) करण्यासाठी प्रथम तेथील जागा स्वच्छ करून घ्या. मातीच्या घटात आणि तांब्याच्या कलशात पाणी भरून, विविध प्रकारची धान्ये, लहान टोपलीत मातीपसरून त्यावर पेरले जातात. शक्यतो यात सात प्रकारची धान्ये असतात. मातीच्या घटात पाणी भरून त्याला एक लाल रंगाता दोरा बांधून ठेवतात. कलशात लाल सुपारी, अक्षता, आणि नाणे टाकून त्याची स्थापना केली जाते. कलशाच्या कडेला विड्याची पाच पाने खोचली जातात. त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर तो ठेवला जातो. देवीच्या पूजेसाठी हा स्थापित केला जातो. नऊ दिवस हा कलश आणि घट ठेवून त्यावर दिप प्रज्वलित करून देवीची उपासना केली जाते. देवीची आरती करून, प्रसाद ठेवला जातो. नऊ दिवस देवीची नित्य नेमाने उपासना करावी.
घटस्थापना मुहूर्त 2025 (Navaratra Utasav 2025 )
यावर्षी सोमवारी 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता 2 ऑक्टोबर ला होणार आहे. 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 पर्यंत आहे.
अनेक ठिकाणी या नऊ दिवसात महिला आणि पुरूष नऊ दिवस उपवास करतात. याकाळात महाराष्ट्रात आणि इतर भागात भोंडला, भजनं करून रात्री देवीचा जागर केला जातो.