Translate :

Sponsored

राष्ट्रीय डॉक्टर दिवस ; सुरूवात 1 जुलै 1991, डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे स्मरण : National Doctors Day ; Start 1 July 1991 ; In Memories of Dr.Bidhan chandra Roy

National Doctors Day 2025 ; Start 1 July 1991 :  दरवर्षी 1 जूलैला भारतात डॉक्टर दिवस साजरा केला जातो. काय करतात हा दिवस साजरा, काय आहे या दिवसाचे महत्त्व हे आपण या लेखात जाणून घेऊ. 

राष्ट्रीय डॉक्टर दिवस : 01/07/2025

समाजात डॉक्टर ही व्यक्ती किती महत्त्वाची आहे, आपल्याला पावलोपावली समजत असते. डॉक्टर हे प्रोफेशन सेवाभावी आहे. समाजातील त्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करणे फार महत्त्वाचा आहे. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावर डॉक्टर महत्त्वाचा असतो. भारतात तर डॉक्टरांना देव मानतात. डॉक्टरांच्या या सेवाभावनेचा, जीव वाचवण्यासाठी केलेले त्यांचे प्रयत्न  आणि त्यांचे कार्य यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जूलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. डॉक्टरांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. ‘डॉक्टर्स डे'(National Doctors Day 2025) का साजरा केला जातो ? कधी सुरू झाला ? त्याचे महत्त्व जाणून घेऊ. 

डॉक्टर्स डे कधी साजरा केला जातो ? (National Doctors Day 2025)

दरवर्षी 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व नागरिक  डॉक्टरांचे आभार मानतात.  मानवाला या जगात आणण्यासाठी आणि त्याला निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांबद्द्ल त्यांचे आभार मानले जातात. कोरोना साथीच्या काळात आपण पाहिले आहे की, अनेक डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली. त्यावरूनच डॉक्टरांचे स्थान किती महत्त्वाचे असल्याचे समजते. त्यांच्या सन्मानार्थ 1 जुलै हा दिवस डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. 

कधी सुरू झाली डॉक्टर्स डे ची सुरूवात ?

भारतात प्रथम 1991 रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरूवता झाली. यावर्षी केंद्र सरकारने  प्रथमच  डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरूवात केली. डॉक्टरांच्या कार्याला सलाम करण्यासाठी, स्मरण रहावे म्हणून या दिवसाची सुरूवात झाली. डॉ. बिधान चंद्र रॉय (Dr.Bidhan chandra Roy) यांच्या स्मरणाप्रित्यर्थ याची सुरूवात झाली. 

कोण होते डॉक्टर बिधान चंद्र राय ?

 डॉ. बिधान चंद्र राय (Dr.Bidhan chandra Roy) हे प्रसिद्ध भारतीय डॉक्टर आणि राजकारणी होते. ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते.  राजकारणी असताना ते एक चांगले  वैद्य सुद्धा होते.  त्यांच्या आयुष्यातील 1950 ते 1962 इतका काळ ते बंगालचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.  वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले.  त्यांना आधुनिक बंगालचे शिल्पकार मानतात.  टीबी मेडिकल इन्सिट्युटच्या स्थापनेत डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा मोलाचा वाटा होता. ते भारताच्या उपखंडातील पहिले वैद्यकीय सल्लागार म्हणून प्रसिद्धी पावले. 4 फेब्रुवारी 1961 रोजी डॉ. बिधान चंद्र राय यांना भारतरत्न सुद्धा प्रदान करण्यात आला होता. मानवतेच्या सेवेतील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाची दखल घेण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यास सुरूवात केली. म्हणून 1 जुलै 1991 पासून राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो. 

त्यांचा जन्म बिहार मधील पटना येथे एका स्थलांतरित बंगाली कायस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मस्थान असणाऱ्या घराचे रुपांतर आता अघोर प्रकाश शिशु सदनामद्ये करण्यात आले आहे. त्यांचे आई-वडील दोघेही ब्रम्हसमाजाचे उपासक होते. बिधान चंद्र हे ब्रम्हचारी होते. त्यांनी आजन्म लोकांची सेवा केली. त्यांचे बालपण आर्थिक ओढग्रस्तीत गेले. त्यांनी बी.ए. ची परिक्षा देऊन पुढे कलकत्त्यातून एम.डी पूर्ण केले. बिहार मधून त्यांनी गणित विषयात पदवी प्राप्त केली. नंतर कलकत्त्यातील मेेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.  आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ पडली तर त्यांनी हॉस्पिटल मध्ये नर्सिंगचे काम सुद्धा केले. सन 1909 मध्ये ते इंग्लडला शिक्षणासाठी गेले. 1911 पर्यंत ते तिथे होते. तिकडून भारतात आल्यावर त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली.   त्यांच्या कष्ट आणि साधना करण्याच्या जोरावर आयुष्यात त्यांनी महान कामं केले. त्यांनी सुरूवातीला आपला खाजगी दवाखाना चालवला. सरकारी नोकरी सुद्धा केली. त्याकाळी अनेक मोठ्या लोकांचे डॉक्टर म्हणून देशात त्यांनी नाव कमावले. मोतीलाल नेहरू, माहात्मा गांधी यांचे ते चिकित्सक म्हणून प्रसिद्ध होते. पुढे ते राजकारणात आले. बिधान चंद्र रॉय हे एक वरिष्ठ वैद्य, शिक्षण तज्ञ, स्वातंत्र्य सेनानी  आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे महत्त्वपूर्ण नेता होते. 

1 जुलै ही तारीख का ?

 थोर वैद्य डॉ. बिधानचंद्र रॉय (Dr.Bidhan chandra Roy) यांचा जन्म 1 जुलै 1882 ला झाला. त्यांचे निधनही 1 जुलै 1962 रोजी झाले. या कारणास्तव त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक डॉक्टरांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा करतात.  

कसा साजरा करतात डॉक्टर दिवस

अनेक सामाजिक संस्था विविध उपक्रम आयोजित करतात. डॉक्टरांच्या सन्मानार्थ हे कार्यक्रम केले जातात. समाजातील त्यांच्या स्थानाचे महत्त्व अधोरिखीत व्हावे, कृतज्ञता व्यक्त व्हावी हा त्याचा हेतू असतो. 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored