Translate :

Sponsored

Nashik TCS Company, Shocking News 2026 : नाशिक टीसीएसमधील तरूणी का सहन करत होत्या कॉर्पोरेट जिहाद ? कारणं आले आहेत समोर : Nashik IT Company Conversion Physical Exploitation National Women Commission Corporate Victim

नाशिक टीसीएसमधील तरूणी का सहन करत होत्या कॉर्पोरेट जिहाद ? कारणं आले आहेत समोर

Nashik TCS Company : नाशिकमधील TCS कंपनीतील प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. धर्मांतर, लैंगिक शोषण या होणाऱ्या प्रकणांनी सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. हे सगळं पीडित तरूणींनी का सहन केलें ? याची कारणं आता समोर आली आहेत.

 नाशिक : 20-04-2026 

नाशिक मधील TCS कंपनीतील (Nashik TCS Company) धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात आता अनेक उलगडे होत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरूणीने हा सगळा त्रास सहन केला आहे. कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरेपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली, अशी माहिती समोर आली आहे. दुसऱ्या पीडितेवर कुटुंबाची जबाबदारी असल्याने नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची माहिती आहे. आजारपणामुले वडील अंथरूणाला खिळलेले, घरात अन्नाचा कण नाही, कुटुंबासाठी पीडितेने सर्व सहन केले असल्याची माहिती येथील सुत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय महिला आयोगाने देखील जाणून घेतली पीडितांची आपबिती (Nashik TCS Company)

काल TCS कंपनीत जाऊन देखील पथकाने तब्बल दीड तास चौकशी केली. कंपनीतील पुरूष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, कामाचे विभाग, कॅन्टिन, वेटींग रूमची पाहणी केली. आज सलग तिसऱ्या दिवशी महिला आयोगाकडून या प्रकऱणाची चौकशी करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून गेल्या 2 दिवसापासून TCS प्रकरणाची झाडाझडची सुरू आहे. महिलांवरील अत्याचार. विनयभंग व धर्मांतराच्या प्रयत्नांचा गंभीर आरोप आहेत.

कॅन्टिन, वेटींग रुमसह विविध विभागांची पाहणी (Nashik TCS Company)

राष्ट्रीय महिला आयोगाच्या चार सदस्यीय पथकाची नाशिकच्या TCS कंपनीच जाऊन प्रत्यक्ष भेट व तपास केलाय पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे. TCS कंपनीतील कार्यालय, कॅन्टीन, वेटींग रुमसह विविध विभागांची पाहणी. आतापर्यंत या प्रकऱणी 9 गुन्ह्यांची नोंद आहे. सुरक्षा व्यवस्था व महिलांसाठीच्या सुविधांचीही तपासणी केलीय POSH अंतर्गत तक्रार समिती कार्यरत आहे का ? याची देखील चौकशी केली. चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर होणार.

निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यता (Nashik TCS Company)

नाशिक TCS प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार आहे. TCS प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांचे पथक निदा खानच्या शोधात आहेत. निदा खान गरोदर असल्याची देखील माहिती समोर आली आहे. निदा खानच्या वकिलानी अटकपूर्व जामीनसाठी नाशिक न्यायालयात अर्ज केले आहे. आजच्या सुनावणीतून निदा खानचे भवितव्य ठरणार आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored