Nandurbar Child Abuse Case : नंदुरबारमध्ये सध्या बालकांच्या लैंगिक अत्याचाराची एक केस उघडकीस आली आहे. मोबाईलमध्ये अनेक अश्लिल व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने अश्लिल व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे पीडितांना ब्लॅकमेल करत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. 2022 ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आला आहे.
नंदुरबार : 08-08-2026
नंदुरबार शहरात (Nandurbar Child Abuse Case) बालक आणि युवकांवर कथित लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर प्रकरण उघ़डकीस आले आहे. या प्रकरणात चेतन कोळी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल जप्त कऱण्यात आला आहे. तपासादरम्यान मोबाईलमध्ये अनेक अश्लिल व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने अश्लिल व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे पीडितांना ब्लॅकमेल करत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
बालके आणि युवकांना ब्लॅकमेल करत होता (Nandurbar Child Abuse Case)
नंदुरबार जिल्ह्यातील बालकं आणि युवकांना 2022 ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक तापासातून संशय व्यक्त कऱण्यात आला आहे. संशयित बालक आणि युवकांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानुसार शहरातील ङोणे फाटा परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी किती बालक व युवक पीडित आहेत, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली आहे.
आरोपी बालकांना जाळ्यात कसा फसवायचा ? (Nandurbar Child Abuse Case)
नंदुरबार येथे रायसिंगपुरा भागातील आरोपी काही मुलांना पैशांच्या अमिषाने जवळ करायचा. नंतर त्यांच्यावर अत्याचार करत. याबाबत आलेल्या तक्रारीनुसार 6 ऑगस्ट रोजी आरोपीने एका अल्पवयीन मुलाला पपईच्या शेतात भेटण्यासाठी बोलावलं होते. मात्र त्याआधीच त्याभागात साध्या वेशात पोलीस नजर ठेवून होते. आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला अटक केली.
लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त कऱण्यात आले (Nandurbar Child Abuse Case)
आरोपीच्या मोबाईलमधल्या व्हिडिओंची पडताळणी करून पोलिसांनी पीडितांची ओळख पटवण्याचं काम सुरू केले आहे. आरोपीजवळ असलेल्या मोबाईल, लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त कऱण्यात आले आहे. जप्त साहित्याच्या तपासणीनंतर व्हिडिओ आणि फोटोंची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांची छाननी सुरू आहे.