Translate :

Sponsored

Mumbai Metro Pillar Collapse, Breaking News 2026 : मुंबईतील मेट्रोचा खांब कोसळला, रिक्षा आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू : Metro Pillar Collapse In Mulund West Several Injured After Debris Falls

मुंबईतील मेट्रोचा खांब कोसळला, रिक्षा आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला.

Mumbai Metro Pillar Collapse : मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुलुंड पश्चिमेकडील बांधकामामध्ये मेट्रोच्या कामाठिकाणी ही दुर्घटना घडली आहेय मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई : 14-02-2026

ईशान्य मुंबईतील मुलुंड भागात आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. मेट्रोचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मेट्रो रेल्वेच्या खांबाचा (Mumbai Metro Pillar Collapse) एक भाग अचानक कोसळला आहे. यात एक दोन वाहने मध्ये असल्याने ते चिरडले गेले. या अपघातात चार जण जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ईशान्य मुंबईतील मुलूंड येेथे शनिवारी दुपारी बांधकामामधील मेट्रो रेल्वे मार्गावरील खांबाचा एक भाग कोसळल्याने तीन ते चार जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने असी माहिती दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कारखान्यासमोरील एलबीएस रोडवर दुपारी 12.20 च्या सुमारास ही घटना घडली , असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि 108 रूग्णवाहिका सेवा घटनास्थळी पोहोचली. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी आजुबाजूचा परिसर वेढा देऊन बंद केला आणि वाहतूक वळवली आहे. घटनास्थळावरून ढिगारा हटवण्यास सुरूवात केली. पोलीस आणि संबंधित एजन्सी सध्या अपघाताचे कारण शोधत आहेत. ज्यामध्ये बांधकामादरम्यान सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले होते का याचाही तपास सुरू आहे.

बीएमसी म्हणते ….(Mumbai Metro Pillar Collapse)

अपघाताबाबत बीएमसीने सांगितले की, “आज दुपारी 12:30 वाजता मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोड, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या खांबाचा एक भाग कोसळला. बांधकामादरम्यान, सिमेंट मेट्रोच्या खांबाचा एक भाग तुटून एका रिक्षावर पडला. मुंबई अग्मिशमन दल, पोलिस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि 108 रूग्णवाहिका सेवा घटनास्थळी उपस्थित आहे.

एकजणाचा मृत्यू (Mumbai Metro Pillar Collapse)

या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. परंतु त्या मृत व्यक्तीबद्दल इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काम सुरू असताना त्या ठिकाणी बॅरिकेडस नव्हते. किंवा कोणत्याही इतर उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. वाहतूक कोंडी होते म्हणून परिसरातील बॅरिकेडस हटवण्यात आले होते, त्यानंतर आजही अपघाताची दुदैवी घटना घडली आहे. ज्यामध्ये चारजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आणि एकजणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored