Translate :

Sponsored

Mumbai High Court Decision, 2026 : बलात्काराच्या दोषीची शिक्षा केली कमी, मुंबई उच्च न्यायालयाचा अजब न्याय, कारण ऐकुण बसेल धक्का ! : Bombay High Court Sentence Reduced For Rape Convict Who Wrote Essay on Mahatma Gandhi

मुंबई उच्च न्यायालयाचा अजब न्याय

Mumbai High Court Decision : मुंबई हायकोर्टाने एका आरोपीच्या तुरूंगातील बऱ्या वागणुकीवरून शिक्षा कमी केल्याची बातमी आहे. 9 डिसेंबर 2016 ला एका 5 वर्षांच्या मुलीवर शेजाऱी राहणाऱ्या 20 वर्षांच्या तरूणीने लैंगिक अत्याचार केले होते. मात्र आता या आरोपीची शिक्षा कमी केली आहे.

मुंबई : 11-02-2026 

मुंबई उच्च् न्यायालयाच्या (Mumbai High Court Decision) एका निर्णयामुळे  सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2026 मध्ये 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका तरूणाची जन्मठेपेची शिक्षा कमी करून 12 वर्षांची केली आहे. 2 फेब्रुवारीच्या आपल्या आदेशात न्यायालयाने दोषी ठरवले परंतु, त्याची शिक्षा कमी केल्याचेही जाहीर केले. न्यायाधीश सारंग कोतवाल आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने आरोपीच्या याचिकेवर हा निर्णय दिला. पण न्यायालयाच्या या निर्णयामुळे सगळीकडे आश्चर्? व्यक्त केले जात आहे.

भारतात असेही, लहान मुलींसह महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. अशात लहान मुलींवर लैंगिर अत्यातार करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी वारंवार होत असते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे.

का कमी केली आरोपीची शिक्षा ? (Mumbai High Court Decision)

गुन्हा घडला तेव्हा आरोपी 20 वर्षांचा होता आणि त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता. तो डिसेंबर 2026 पासून सतत तुरूंगात होता आणि कोविड-19 साथीच्या काळातही त्याची सुटका झाली नव्हती. शिक्षा निश्चित करताना या परिस्थीती महत्त्वाच्या मानल्या गेल्या.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, तुरुंगात त्याचे सुधारणात्मक प्रयत्न देखील विचारात घेण्यात आले. रेकॉर्डमध्ये सादर केलेल्या प्रमाणपत्रांनुसार त्याने तुरूंगात शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये महात्मा गांधींवरील निबंध स्पर्धा आणि त्यांच्या विचारांवर अभ्यास कार्यक्रमांचा समावेश होता. या सुधारणात्मक पैलुंकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे म्हटले आहे.

सुधारणांच्या संभाव्यतेलाही महत्त्व दिले पाहिजे -न्यायालय (Mumbai High Court Decision)

गुन्हा गंभीर असला तरी, सुधारणेच्या संभाव्यतेलाही महत्त्व दिले पाहिजे. ज्यावेळी 12 वर्षांची शिक्षा न्यायाच्या उद्दिष्टांची पूर्तता करेल. तसेच आरोपीने आधीच तुरूंगात घालवलेला कालावधी कमी केलेल्या शिक्षेमध्ये समायोजित केला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केेले आहे.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, 9 डिसेंबर 2016 ला, 5 वर्षांची पीडित मुलगी पाणी आणण्यासाठी शेजाऱ्याच्या घरी गेली असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने ताबडतोब तिच्या आईला घडलेले प्रकार सांगितला, त्यानंतर कुटुंबाने पोलिस तक्रार दाखल केली. खटल्यादरम्यान, आठ वर्षांची पीडित मुलगी न्यायालयात साक्ष देत होती.

उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीची साक्ष विश्वासार्ह मानली. न्यायालयाने असे म्हटले की मुलाने घटनेचे स्पष्ट आणि माहिती नसलेले वर्णन विश्वासार्ह आहे. या आधारे दोषी ठरण्यात आले आणि शिक्षेला अंशतः सवलत देण्यात आली.

शिक्षा कमी करण्याची प्रमुख कारणे  (Mumbai High Court Decision )

गुन्ह्याच्या वेळी आरोपी केवळ 20 वर्षांचा होता आणि त्याचा कोणताही जुना गुन्हेगारी इतिहास नव्हता. 2026 पासून तो सलग तुरूंगात असून कोविड काळातही त्याची सुटका झाली नव्हती, हे न्यायालयाने महत्त्वाचे मानले. आरोपीने तुरुंगात असताना महात्मा गांधीवरील निबंध स्पर्धा आणि त्यांच्या विचारांवरील अभ्यासक्रमांत सक्रिय सहभाग घेतला होता. या शैक्षणिक उपक्रमांची प्रमाणपत्रे न्यायालयाने सुधारणेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली आहेत.

“गुन्हा गंभीर असला तरी सुधारणेच्या शक्यतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असे खंडपीठाने स्पष्ट केले. 12 वर्षांची शिक्षा न्यायाच्या उद्देशाने पुरेशी असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored