Mukul Dev Death : हिंदी चित्रपट सृष्टीतील एका गुणी आभिनेत्याचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मुंबई : 2025-05-24
हिंदी चित्रपट सृष्टीतील हँन्डसम अभिनेता मुकुल देव (वय 54 ) ( Mukul Dev )यांचे निधन झाले. संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सन ऑफ सरदार, आर राजकुमार आणि जय हो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केेलेल्या प्रसिद्ध आभिनेत्याने वयाच्या 54 व्या वर्षी 23 मे ला या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मागे पत्नी शिल्पा देव आणि मुलगी सिया असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण टिव्ही आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुकुल देव हे चित्रपटसृष्टीत येण्यापूर्णी पायलट होते, ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यांनी कमर्शियल पायलट चे प्रशिक्षण घेतले होते. मात्र त्यांना पहिल्यापासूनच अभिनयात रस होता. यामुळेच त्यांनी अभिनयात करियर करायचा निर्णय घेतला.
मुकुल देव ( Mukul Dev )यांनी 1996 मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनी सुरूवातील टिव्ही शो मुमकिन मद्ये काम केले. त्यानंतर दुरदर्शनवरील कॉमेडी शो एक से बढकर एक मध्ये त्यांनी काम केले. या शोने त्यांना खरी ओळख मिळवून दिली होती. यानंतर कही दिया जले कही जिया आणि कहानी घर घर की अशा काही प्रसिद्ध हिंदी टिव्ही सिरियल्स मध्ये त्यांनी काम केले.
टिव्ही इंडस्ट्रीत यश मिळवल्यानंतर त्यांनी ( Mukul Dev ) आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. चित्रपट करियरची सुरूवात च्यांनी दस्तर या चित्रपटापासून केली. यात त्यांनी साकारलेल्या एसीपी रोहित मल्होत्रा ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्यांनी यमला पगला दिवाना, सन ऑफ सरदार, आर राजकुमार आणि जय हो अशा अनेक चित्रपटातंमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी फियर फॅक्टर इंडीया सीजन 1 चे होस्टींगसुद्धा केले आहे. अशा हरहुन्नरी कलाकाराचे अचानक निधन झाल्याने त्यांचे फॅन आणि सहकलाकारांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.