Translate :

Sponsored

MRI Service Mumbai, Good News 2026 : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! पालिका रूग्णालयांमध्ये वाढणार MRI सेवा, आरोग्य व्यवस्थेला मिळणार बळकटी : Relife For Mumbai Residents MRI Services To Start Soon In Civic Hospitals Boosting Public Healthcare Mumbai

मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! पालिका रूग्णालयांमध्ये सुरू होणार MRI सेवा, आरोग्य व्यवस्थेला मिळणार बळकटी.

MRI Service Mumbai : मुंबईतील रूग्णांना MRI साठी खाजगी रूग्णालयांवर अवलंबून रहावे लागणार नाही. महापालिकेच्या केईएम, नायर, कूपर आणि सायन या चार महत्त्वाच्या रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक एमआरआय सेवा सुरू केली जाणार आहे.

मुंबई : 20-03-2026 

महापालिकेच्या प्रमुख रूग्णालयांमध्ये लवकरच एमआरआय सेवा (MRI Service Mumbai) उपलब्ध होणार असून यासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित कंत्राटदाराला (सर्वात कमी दर) आधारावर काम देण्यात आले असून प्रत्येक रूग्णालयासाठी स्वतंत्र वर्क ऑर्डर जाहीर देण्यात आली आहे, अशी माहिती प्रमुख रूग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी दिले. यामुळे मुंबईतील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, महानगरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या केईएम, नायर, कूपर आणि सायन या चार महत्त्वाच्या रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक एमआरआय सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे रूग्णांना खासगी केंद्रावर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार असून, कमी खर्चात आणि वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे.

मुंबई महापालिकेकडून प्रक्रियेला गती  (MRI Service Mumbai)

एमआरआय ही अत्यंत महत्त्वाची निदान चाचणी असून मेंदू, मणका, स्नायू तसेच अंतर्गत अवयवांशी संबंधित आजारांचे अचूक निदान कऱण्यासाठी ती उपयुक्त ठरते. मात्र, आतापर्यंत पालिका रुग्णालयांमध्ये ही सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने रूग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. एमआरआय सेवेसाठी मागील काही वर्षापासून सातत्याने मागणी होत होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही या मुद्द्यावर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेेने या प्रक्रियेला रजी देत टेंडर पूर्ण करून आता प्रत्यक्ष सेवा सुरू कऱण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

महापालिकेतील रुग्णालयांमध्ये एमआरआय ची सेवा वाढल्याने होणारे फायदे (MRI Service Mumbai)

वेटिंग लिस्ट कमी होणार आहे. सध्या असलेली दीर्घ प्रतिक्षा यादी मोठया प्रमाणात घटणार.

जलद निदान आजारांचे लवकर व अचूक निदान होणार

कमी खर्च-खासगी केंद्रांच्या तुलनेत स्वस्त दरात सेवा

स्थानिक पातळीवर सुविधा सहज उपलब्ध होणार

रुग्णांचा वेळ वाचणार, अपॉइंटमेंटसाठी होणारा विलंब वाचणार.

रूग्णालयांमध्ये महापालिकेच्या एमआरआय सेवा सुरू कऱण्यासाठीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून वर्क ऑर्डरही जारी करण्यात आल्या आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य रूग्णांना कमी खर्चात आणि जलदगतीने निदानाची सुविधा मिळेल. तसेच रूग्णालयांवरील ताण कमी होऊन आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल – डॉ. शैलेश मोहिते, संचालक, पालिका प्रुमख रूग्णालयं.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored