Translate :

Sponsored

Monsoon Update , Konkan, Vidarbha is On High Alert : मान्सूनचे दमदार पुर्नरागमन ! कोकण घाटमाथ्यावर मुसळधार, तर, विदर्भात…; आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकण आणि घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई आणि उपनगरातही पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे.

महाराष्ट्र :2025-06-19

हवामान खात्याने आज गुरुवारसाठी रायगड, रत्नागिरीसह पुणे व साताराच्या घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणपणे ढगाळ असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

गुजरात आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे सरकले आहे. त्यामुळं पश्चिम बंगाल आणि परिसरावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं गुजरात महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व भारतात ढग जमा झाले आहेत. त्यामुळं पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळं दोन दिवसांत मान्सूनची आणखी प्रगती होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.

या जिल्ह्यांना इशारा

ऑरेंज अलर्ट- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, सातारा घाटमाथा

यलो अलर्ट- पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा

वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदडे, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली

मुंबई उपनगर परिसरासह ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले

मुंबई शहर, उपनगर आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याला काल पासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. काल संध्याकाळपासून अविरतपणे पाऊस कोसळत असून आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कामावर जणाऱ्याची तारांबळ उडताना दिसत आहे. दरम्यान जोरदार पावसाने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून मध्य रेल्वे ची वाहतुक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे.

धरणक्षेत्रात संततधार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस होत आहे. गेल्या दोन दिवसांत धरणांतील पाण्याची पातळी दोन टक्क्यांनी वाढल्याने 23 हजार दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. मात्र, तरीही राखीव साठ्यातून पाणी उचलणे सुरूच आहे. दुसरीकडे पवई तलाव यंदा जूनमध्येच ओसंडून वाहू लागला आहे. हा तलाव साधारणपणे जुलैमध्ये भरतो, असे महापालिका प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored