Translate :

Sponsored

Monsoon Skin And Hair care Tips : पावसाळ्यात कशी राखाल केस आणि त्वचेची निगा ? या घ्या काही टिप्स

 

जीवनशैली : 2025-05-15

उन्हाळा संपत आला आहे आणि पावसाळ्याची चाहूल सर्वांनाच लागली आहे. अनेक भागात सध्या पावसाने थोडीफार हजेरी लावण्यास सुरूवाच केली आहे. मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहेच, महाराष्ट्रातही 6 जूनपर्यंत पाऊस येणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. चला तर मग तुमची तयारी झाली का पावसाळ्याची ? ऋतु कोणताही असो, हवामानानुसार तुम्हाला तुमचे केस आणि त्वचा यांची काळजी घ्यावी लागते. तरच आजकालच्या प्रदुषण आणि तणावयुक्त वातावरणात तुम्ही निरोगी दिसणार आहात. या लेखात तुम्हाला पावसाळ्यात कशी काळजी घ्यायची आपल्या त्वचा आणि केसांची हे बघणार आहोत. 

पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल ? 

  • केसांचा कोरडेपणा, रखरखीतपणा, केसं फ्रिजी दिसणे , केस अचानक खुप गळणे अशा काही समस्या दिसून यायला लागतात. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही ऋतुमानानुसार आणि तुमच्या केसांच्या प्रकारानुसार शाम्पू, कंडिशनर, सिरम या सगळ्या गोष्टी वापरा.
  • प्रत्येक केस धुण्यानंतर कंडिशनरचा वापर करा.
  • हेअर ड्रायरचा वापर टाळा, वापरणार असाल तर योग्य अंतरावरून त्याचा वापर करा.
  • पावसाळ्यात सारखे केस ओले होई देऊ नका. त्यासाठी पावसाळी टोपी वापरा.
  • केस जास्त काळ ओले राहू देऊ नका.
  • केसांना पोषण मिळेल असा आहार घ्या.  आहारात तीळ, भोपळा, सुर्यफुलाच्या बिया, जवस यांचा योग्य प्रमाणात समावेश करा.

पावसाळ्यात त्वचेची काळजी  कशी घ्यावी ? 

  • पावसाळ्यात तहान खुप कमी लागते. मात्र तरीही शरिरातील पाण्याचे प्रमाण  कमी होऊ देऊ नका. योग्य प्रमाणात पाणी प्या.
  • तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार म्हणजे, कोरडी, तेलकट किंवा मध्यम जशी तुमची त्वचा आहे, त्यानुसार त्वचेसाठी घरगुती फेसपॅक तयार करून त्याचा वापर करा. आठवड्यातून किमान दोनवेळा त्यांचा वापर करा.
  • उन्हाळ्या प्रमाणेच पावसाळ्यातही सनस्क्रीनचा वापर करा.
  • पावसाळ्यात सतत पावसात भिजण्याने, किंवा वातावरणात ओलावा असल्याने त्वेचेला फंगल इंन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते, अशा वेळी त्वचा वेळीच कोरडी करून, योग्य त्या क्रिम, पावडरींचा वापर करा.
  • हवेतील गारवा आणि मुसळधार पाऊस यांमुळे तळलेले पदार्थ आणि चहा, कॉफी घ्यावी वाटते, परंतु त्याचे अतिसेवन टाळा.
  • पावसाळ्यात फंगल इंन्फेक्शनचा धोका जास्त असतो, त्वचा निरोगी ठेवणे अवघड जाते. त्यामुळे बाह्य प्रोडक्ट प्रमाणेच आहार सुद्धा योग्य निवडायला हवा. त्वचेसाठी लिंबूवर्गीय फळे जास्त खावीत.  आहारात व्हिटामिन सी युक्त पदार्थांचा समावेश करावा.

त्वचेसाठी उपयोगी ठरणारे काही घरगुती फेसपॅक –

  • कोरफडीचा गर – तुम्ही घराच्या गॅलरीत किंवा अंगणात कोरफडीचे रोप लावले असेल, तर पावसाळ्यात याचा वापर तुम्ही फेसपॅक म्हणून करू शकतात, कोरफड ही त्वचेसाठी उत्तम काम करते. त्वचा स्वच्छ ठेवते. कोरफडीच्या गरामध्ये तुम्ही हळद, मध असे इतर काही पर्याय तुम्ही वापरू शकता.
  • कडुनिंबाच्या पानांचा फेसपॅक
  • कडुनिंबाचे झाड सहज तुम्हाला उपलब्ध असेल, तर तुम्ही ताजे पानं घेऊन त्याची पेस्ट बनवून ती चेहऱ्याला लावू शकता. मात्र जर तुमच्याजवळ कडुनिंबाचे झाड नसेल तर उन्हाळ्यात त्याती पानं धुवून सुकवू शकता. म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला त्याची पावडर बनवून फेसपॅक म्हणून वापर करता येतो.
  • टोमॅटे – टोमॅटो रस किंवा त्यात मध, हळद, कोरफड असे काही मिसळून हा पॅक चेहऱ्याला लावू शकता.
  • कच्चे दुध, साय – कच्चे दुध किंवा साय यांच्यात हळद मिक्स करून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरा.
  • बदाम – बदाम भिजवून ते उगाळून किंवा पेस्ट करून चेहऱ्याला लावा. त्वचा मऊ, तजेलदार बनते.
  • पपई आणि केळं – हे दोन्ही फळं उत्तम फेशियलचे काम करतात. यांचा गर, थोडा मध हे एकत्र करून याचा मसाज चेहऱ्यावर करा.

याशिवाय संपूर्ण पावसाळ्यात पाणी उकळून प्या, पावसात नेहमी भिजणं टाळा. आरोग्याची काळजी घेत, पावसाळ्याचा आनंद घ्या. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored