Translate :

Sponsored

Miss World 2025 Contestant From India Nandini Gupta In Top 4 : मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत भारताला मोठे यश ; नंदिनी गुप्ता पहिल्या 4 टॉप स्पर्धकांमध्ये

भारतात भरवल्या गेलेल्या यंदाच्या मिस वर्ल्ड   ( Miss World 2025 )  स्पर्धेत नंदिनी गुप्ता (Nandini Gupta ) भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. नंदिनी गुप्ता ही पहिल्या 4 टॉपच्या स्पर्धकांमधील एक म्हणून निवडली गेली आहे. 

हैद्राबाद : 2025-05-25

मिस वर्ल्ड 2025 ( Miss World 2025 )  च्या स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे. 108 देशांच्या सुंदरींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. भारताच्या नंदिनी गुप्ताने (Nandini Gupta ) या स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे. ती पहिल्या 4 टॉपच्या स्पर्धकांमध्ये निवडली गेली आहे. 

नुकतेच हैद्राबादच्या ट्राईडेंटन हॉटेलमध्ये एका स्पर्धेचे ( Miss World 2025 )  आयोजन करण्यात आले होते. ज्यात पहिल्या चार टॉपच्या स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नंदिनी गुप्ता (Nandini Gupta ) हिने आपले स्थान निश्चित केले आहे. मिस वर्ल्ड 2025 चा ग्रँड फिनालेच्या पहिलेच नंदिनी गुप्ता पहिल्या चार क्रमांकाच्या स्पर्धकांच्या रांगेत जाऊन बसली आहे. यामुळे भारताची मिस वर्ल्ड 2025 चा किताब मिळवण्याची शक्यता वाढली आहे. 

आशिया आमि ओशोनिया प्रदेशातून नंदिनी गुप्ता (मिस इंडीया ) आणि समांथा पूल (मिस न्युझिलंड ) यांची निवड करण्यात आली आहे. अफ्रिकन खंडातून फतौमाता कौलिबली ( मिस कोट डी आयव्होअर ) आणि सेल्मा कामन्या (मिस नामिबिया ) यांची निवड झाली आहे. अमेरिका आणि कैरेहियाकडून वेलेरिया कैनावो (मिस वेनेजुएला ) आणि ऑरेली जोआचिम (मिस मार्टानिक ) यांना निवडले आहे. या स्पर्धेसाठी एकुण 8 जणींची निवड करण्यात आली होती. ज्यांना पहिल्या चार खंडांमधून निवडण्यात आले आहे. 

मिस वर्ल्ड 2025 ( Miss World 2025 )  च्या स्पर्धेतील पुढील सर्व स्पर्धा या याच आठ स्पर्धकांमध्ये होणार आहेत. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या संचालिका जूलिया मोलें यांनी सांगितले की, ही स्पर्धा फक्त सुंदरतेती नसून, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रतिक आहे. नंदिनी गुप्ता हिची निवड पहिल्या 4 जणींमध्ये झाली आहे. ही गोष्ट भारतासाठी फार मोठी आहे. भारतातच आयोजीत करण्यात आलेल्या या स्पर्धेची विजेती भारतीय नंदिनी गुप्ताच व्हावी असे प्रत्येक देशवासियांना वाटत आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored