Translate :

Sponsored

मुंबईच्या जवळ घर घेण्याचं तुमचं स्वप्न आलयं आवाक्यात; 6 हजारांनी किंमती केल्या कमी; काय आहेत नवीन किंमती ? : MHADR Reduces Thane Home Prices Affordable Housing For EWS Price Cuts Announced.

Thane Mhada Schem : ठाण्यात 6248 म्हाडा घरांच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आहेत. शिरगाव आणि खोणी येथील या घरांच्या किंमती प्रति युनिट 1 लाख ते 1 लाख 43 हजारांनी कमी करण्यात आली आहे. 

ठाणे : 24/06/2025

मुंबई आणि मुंबईच्याजवळपास घर असावं असं प्रत्येक मुंबईत येणार्या माणसाला वाटतं. रोजीरोटीसाठी येणाऱ्या सर्वसमान्यांना  घरं घेणें आता आवाक्यातील स्वप्न होणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमती आता कमी झाल्या आहेत. म्हाडा (Thane Mhada Schem) सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करून देत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाण्यातील तब्बल 6 हजारांहून अधिक घरांच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (MHADA) येणाऱ्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने ठाणे जिल्ह्यातील 6.248 घरांच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) घटकांसाठी ही एक संधी असणार आहे. पंतप्रधान आवास योजना (शहरी ) अंतर्गत कल्याणमधील शिरगाव आणि खोणी गावांमध्ये ही घरे आहेत. आता ही घरं ‘पाहिले येईल त्याला प्राधान्य’ या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. 

किंमत कपातीला मंजुरी 

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकवाड यांनी सांगितले की, ही किंमत कपात EWS वर्गातील रहिवाशांना घर घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्वरीत अर्ज करावा, असे आवाहन त्यांनी केले. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या किंमत कपाताली मंजुरी दिली आहे. 

कशी असणार नवी किंमत ?

ठाण्यातील शिरगावमधील 5 हजार 263 घरांच्या किंमतीत प्रति युनिट 1 लाख 43 हजार 404 रूपयाने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे घरांची मूळ किंमत 20 लाख 72 हजार 146 वरून आता ती 19 लाख  28 हजार 742 इतकी झाली आहे. तर खोणीतील 1 हजार 012 घरांच्या किंमतीत प्रति युनिट 1 लाख 01 हजार 800 ने कपात कऱण्यात आली आहे. त्यामुळे या घरांची मूळ किंमत 20 लाख 13 हजार 500 वरून आता ती 19 लाख 11 हजार 700 इतकी झाली आहे. या किंमती कमी झाल्याने अनेक EWS कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे सोपे होणार आहे. 

लॉटरी पद्धती कशी असणार ?

येत्या जुलै महिन्यात चार हजार घरांची लॉटरी म्हाडा जाहीर करणार आहे. यात चितळसर येथे हाऊसिंग स्टॉकमधून उभारलेल्या 1173 घरांचा समावेश आहे. तर कल्याणमध्येही म्हाडा अडीच हजारांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाची सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत. यावर्षी 2025-2026 च्या अर्थसंकल्पात म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपति संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळामार्फत एकुण 19 हजार 497 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. 

म्हाडाकडून मुंबईतसुद्धा लॉटरी

म्हडाकडून मुंबई मंडळात पाच हजार घरांची लॉटरी काढण्याक येणार आहे. ही लॉटरी दिवाळीपर्यंत जाहीर होण्याची  शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने राज्यात 19 हजार 496 घरांच्या बांधकामाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे. त्यापैकी 5199 घरे बांधण्यात येणार आहे. याशिवाय पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण मंडळांमध्येही घरांची कामे सुरू आहेत. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored