Translate :

Sponsored

Mens World Cup 2027, Good News : एकदिवसीय वर्ल्डकप 2027 होणार 3 देशांंमध्ये, 12 स्टेडियममध्ये मिळून होणार 57 सामने : World Cup 2027, 3 Countries hosts, 12 Venues 57 Matches For Men

एकदिवसीय वर्ल्डकप 2027 होणार 3 देशांंमध्ये, 12 स्टेडियममध्ये मिळून होणार 57 सामने.

Mens World Cup 2027 : ICC पुरूष क्रिकेट विश्वचषक 2027 चा थरार दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामबियामध्ये अनुभवायला मिळणार आहे. आयसीसीने या भव्य सोहळ्यासाठी 12 ऐतिहासिक आणि नवीन ठिकाणांची नावे जाहीर केली.

दक्षिण अफ्रिका : 31-07-2026 

आयसीसी पुरूष क्रिकेट वर्ल्ड कप 2027 (Mens World Cup 2027) कधी होणार याची प्रतिक्षा आता संपली आहे. दक्षिणा अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नमबिया येथे  पुरूष क्रिकेट World Cup 2027 होणार आहे. आयसीसीने या भव्य स्पर्धेसाठी 12 ऐतिहासिक आणि नवीन ठिकाणांची नावे निश्चित केली आहेत. या तीन देशांमध्ये संयुक्तपणे खेळली जाणारी ही प्रतिष्ठित स्पर्धा केवळ खेळांचा थरारच दाखवणार नाहीत, तर यात एक नवीन स्पर्धेचे स्वरूपही पहायला मिळेल.

या वर्षी एकदिवसीय विश्वचषकाचा सर्वात मोठा भाग दक्षिण अफ्रिकेत आयोजित केला जाणार आहे. हा अफ्रिकन देश आठ शहरांमधील स्टेडीयममध्ये सामन्यांचे आयोजन कऱण्यास सज्ज होत आहे.

जोहान्सबर्गचे  ऐतिहासिक वँडरर्स स्टेजियम, त्शवानेचे सेंचुरियन स्टेडियम, केप टाऊनचे नयनरम्य न्यूलँडस, क्रिकेट ग्राऊंड आणि डर्बनचे किंग्समीड स्टोडियम पुन्हा एकदा विश्वचषकातील अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होतील. याव्यतिरिक्त, जगातील आघाडीचे संघ गकेबारहा येथील सेंट जॉर्ज पार्क, ब्लोमफॉन्टेन येथील मांगाउंग ओव्हल, पार्ल येथील बोलँड पार्क आणि कुगोम्पो शहरातील बफेलो पार्क येथे भिडतील.

दक्षिण अफ्रिकेकडील यजमानपदाचा अनुभव (Mens World Cup 2027)

दक्षिण अफ्रिकेचा हा यजमानपदाचा पहिला अनुभव नाही. 2003 मध्ये त्यांनी पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचे सह-आयोजन केले होते. त्यानंतर, या देशाने 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक, 2023 मध्ये महिला टी-20 विश्वचषक आणि 2020 व 2024 मध्ये 19 वर्षांखालील पुरूष क्रिकेट विश्वचषक, 2023 मध्ये महिला टी-20 विश्वचषक आणि 2020 व 2024 मध्ये 19 वर्षांखालील पुरूष क्रिकेट विश्वचषक यांसारख्या प्रमुख आयसीसी स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे.

झिम्बाब्वेमधील तीन स्टेडियमवर होणार सामने (Mens World Cup 2027)

दुसरीकडे, अफ्रिकन खंडातील आणखी एक बलाढ्य देश असलेल्या झिम्बाब्वेला तीन मैदाने देण्यात आली आहेत. राजधानी हरारेमधील प्रसिद्ध हरारे स्पोर्टस क्लब, बुलावायोमधील क्वीन्स स्पोर्टस क्लब आणि व्हिक्टोरिया फॉल्सच्या निसर्गरम्य परिसरात बांधलेले नवीन फाले मोसी-ओआ-तुन्या आंतरराष्ट्रीय. क्रिकेट स्टेडियम, येथे अनेक महत्त्वाचे सामने आयोजित केले जातील. झिम्बाब्वेने 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेसोहत विश्वचषकाचे सह-आयोजन केले होते, त्यामुळे येथील चाहत्यांना तोच उत्साह पुन्हा अनुभवण्याची संधी मिळेल.

नामबियाची पहिलीच संधी (Mens World Cup 2027)

या स्पर्धेचे सर्वात अद्वितीय आणि ऐतिहासकि वैशिष्ट्य म्हणजे नामबियाचा सहभाग. नामिबिया पहिल्यांदाच वरिष्ठ आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. राजधानी विंडहोकमधील नामबिया क्रिकेट ग्राऊंडची या भव्य कार्यक्रमासाठी निवड कऱण्यात आली आहे. जो नामबियाच्या क्रिकेट इतिहासाच्या सुर्वण पानांमध्ये नोंदवला जाईल. नामबिया आणि झिम्बाब्वेने यावर्षी 19 वर्षांखालील पुरूष क्रिकेट विश्वचषकाचे यशस्वीपणे आयोजन केले होते.

57 सामने आणि एक नवीन रोमांचक स्वरूप (Mens World Cup 2027)

स्पर्धेचे स्वरूप, रचना आणि गणित पाहिले, तर 2027 चा विश्वचषक 57 सामन्यांमध्ये खेळला जाणार आहे. एक दिर्घ आणि रोमांचक लढाई असेल. एक पूर्णपणे नवीन स्वरूप सादर कऱण्यात आले आहे. जे प्रेक्षकांना सुरूवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल.

मुख्य टप्प्याची सुरूवात सुपर सिरीजने होणार (Mens World Cup 2027)

या स्पर्धेची सुरूवात ‘सुपर सिरीज’ ने होणार आहे. क्रमवारीत 12 व्या ते 14 व्या क्रमांकावर असलेल्या तीन संघांमधील लढत असेल. ही सीरिज जिंकणारा संघच मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. त्यानंतर 12 मुख्य संघांना प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागले जाईल. ‘लीग टप्प्या’मध्ये, प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरूद्ध एक सामना खेळेल. केवळ या सुरूवातीच्या टप्प्यातच एकूण 30 सामने खेळले जातील.

सुपर 7 फेरीत झुंज (Mens World Cup 2027)

लीग टप्पा पूर्ण झाल्यावर, प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ आणि दोन्ही गटांतील त्यानंतरची सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ, म्हणजेच एकूण सात संघ, पुढील फेरीत प्रवेश करतील. याला सुपर 7 टप्पा म्हटले जाणार आहे. सुपर 7 मध्ये, सर्व सात संघ एकूण 21 राऊंड-रॉबिन सामने खेळतील, ज्यात प्रत्येक गुणासाठी तीव्र चुरस असणार आहे.

उपांत्य फेरी आणि फायनल (Mens World Cup 2027)

सुपर 7 चा थरार संपल्यानंतर, गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ पहिल्या उपांत्य फेरीत चौथ्या स्थानावरील संघाशी सामना करतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ दुसऱ्या उपांत्य फेरीत एकमेकांविरूद्ध खेळतील. या दोन सामन्यांचे विजेते क्रिकेटचे नवे सत्ताधिश समजले जातील.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored