महाराष्ट्रातील मराठवाड्यात पावसाळ्यात वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे ( Marathwada Lightning Deaths ) प्रमाण वाढले आहे. मात्र त्यापासून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठीच्या कोणत्याही प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
मराठवाडा : 2025-05-21
महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या आगमनाला अजून पंधरा दिवस बाकी असताना, त्याआधीच पावसाला सुरूवात झालेली आहे. सध्या मुंबई, पुणे, कोकण , मराठवाडा आणि विदर्भात जोराच्या पावसासह वीजांचा कडकडाटही होत आहे. अशा पावसामधील विजांच्या कडकडाटामुळे दुर्घटना होण्याचा संभव जास्त असतो. मराठवाड्यात अशा वीज पडून होणाऱ्या अपघात आणि मृत्यूचे प्रमाण ( Marathwada Lightning Deaths ) जास्त आहे. अशा अपघातांना कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी बोल्ट अरेस्टर (Bolt Arester) सारखे उपकरणं बसवण्यात आलेले नाहीत. बोल्ट अरेस्टर सुरक्षात्मक उपकरण असते. आकाशात चमकणाऱ्या वीजा पडताना त्या वीजा सुरक्षितपणे जमिनीत टाकण्यासाठी या उपकरणाचा वापर होतो. या उपकरणाच्या सहाय्याने वीजेमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण होते.
प्रशासकिय आकडेवारीनुसार साल 2023 मध्ये वीज पडून 48 नागरिकांचे मृत्यू झाले होते. 2024 मध्ये 76 अशा घटना झाल्या होत्या. अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या विभागीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांकडून कोणताही प्रस्ताव आला नाही.
विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केेलेल्या अहवालात म्हटले आहे की, 2024 मध्ये पावसाळ्यापूर्वी येथे झालेल्या आढावा बैठकीत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते की, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 100 बोल्ट अरेस्टर उपकरणं लावण्यात यावेत. परंतु अद्याप कोणत्याही जिल्ह्यातील प्रशासनाकडून या उपकरणांच्या खरेदीसाठीचे प्रस्ताव आलेले नाहीत.
लातूर मध्ये दोन वर्षात वीज पडून 20 जणांचा मृत्यू
लातूर जिल्ह्यात 2023 मध्ये वीज पडून 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2024 मध्ये याच संख्येत वाढ होऊन हा आकडा 15 वर गेला. या घटनांनंतरही येथे केवळ 3 बोल्ट अरेस्टर (Bolt Arester ) उपकरणं बसवण्यात आले आहेत. जालन्यामध्ये अशा मृत्यूची संख्या 12 लोकांचा मृत्यू झाला. येथेही फक्त 3 बोल्ट अरेस्टर उपकरणं आहेत. बीड जिल्ह्यात 308 उपकरणं आहेत, मात्र येथेही वीज पडून मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार – परभणी मध्ये 4 उपकरणं आहेत, मात्र ते सर्व खराब आहेत. 2024 मध्ये परभणीत झालेल्या मृत्यूच्या घटना 10 आहेत.
मराठवाड्यात एकुण बोल्ट अरेस्टरची संख्या 403 आहे.
जिल्ह्यानुसार त्यांची वर्गवारी अशी –
छत्रपती संभाजीनगर – 75, जालन्या – 3, परभणी – 4, हिंगोली – 2, नांदेड – 4, बीड – 308, लातूर – 3, धाराशिव – 4 .
विभागिय आयुक्त दिलीप गावडे यांनी पीटीआयला सांगितले की, मी सर्व जिल्हा प्रशासनांना बोल्ट अरेस्टर बसवलेल्या भागाचे काय परिणाम झाले आहेत हे तपासण्याचे आदेश दिले आहेत.
(बातमी सोर्स पीटीआय )