Translate :

Sponsored

राज ठाकरेंवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी; 5 जुलैच्या भाषणावर आक्षेप, हायकोर्टाच्या तीन वकिलांनी केली तक्रार : Raj Thackery ,Marathi Language Controversy, 5 July, NSA Bombay HC Advocates Compalint

Raj Thackery, Marathi Controversy : मुंबईत 5 जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणावर आक्षेप घेतला गेला आहे. मुंबई हायकोर्टाच्या तीन वकिलांना FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. वकिलांना राज ठाकरे यांच्या भाषणावर द्वेष निर्माण करणारे असल्याते म्हटले आहे. 

मुंबई : 15/07/2025

मुंबईला 5 जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी विजयी रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे वाद (Marathi Language Controversy) निर्माण झाला आहे. हे भाषण लोकमानसाच्या भावना भडकवणारे आहे, असे मुंबई हायकोर्टाच्या तीन वकिलांचे म्हणणे आहे. त्यांनी डीजीपींना पत्र लिहून राज ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर आणि त्यांच्या भाषणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या भावना भडकवणाऱ्या भाषणावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

वकिलांनी म्हटले आहे की, मराठी महाराष्ट्राची क्षेत्रिय भाषा आहे आणि मराठी भाषेचा सन्मान करणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मनसे कार्यकर्त्यांच्या कडून मराठी भाषेच्या मुद्यांवरून अन्य राज्यांतील लोकांवर हल्ले करणे, अपमान करणे आणि हिंसेसारख्या काही घटना समोर आल्या आहेत. ही परिस्थिती गंभीर असून संविधानासाठी पूरक नाही. 

मुंबईतील राज ठाकरे यांनी केले होते भाषण (Raj Thackery, Marathi Language Controversy )

तक्रारीत असे म्हटले आहे की, 5 जुलैला मुंबईत राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, ” जो कोणी आमच्याशी अभद्र भाषेत बोलणं करेल, त्यांना एक मिनीटात शांत केले जाईल. त्यांनी असेही सांगितले की, मारहाणीचा व्हिडियो करायचा नाही. तक्रार केलेल्या वकिलांचे असे म्हणणे आहे की, हे भाषण सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे. हे भाषण संविधानाच्या अनेक बाबींचे उल्लंघन करत आहे. या भाषणामुळे राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक रुप धारण करून, अनेकांवर हल्ला केला, कार्यालयांची तोडफोड केली आहे. अशा घटनांविषयीचे एफआयआर दाखल करण्यात आले आहे. 

राज ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी

(Raj Thackery, Marathi Language Controversy )

वकिलांमार्फत राज ठाकरे यांच्या विरोधात कलम 123 (45), कलम 124 , कलम 232, कलम 345, कलम 357च्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. वकिलांची मागणी आहे की, राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई करावी. 

हिंसक घटनांवर कारवाई व्हावी

अशा प्रकारच्या भाषणामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात द्वेषाचे वातावरण निर्माण होत आहे. यामुळे देशाची सामाजिकता, एकता, शांतता आणि सुरक्षाव्यवस्था यांना धोका निर्माण झाला आहे. या वकिलांनी असेही म्हटले आहे की. जर वेळेत अशा भाषणांवर आणि हिंसक घटनांवर कारवाई केली नाही, तर सामान्य जनतेत्या मानसिक स्थितीवर, व्यापारावर आणि शिक्षणावर प्रतिकुल प्रभाव पडणार आहे.

या वकिलांचे म्हणणे आहे की, राज्यात अराजकता आणि द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम सरकारचे मुख्य काम आहे. कोणत्याही परिस्थितीत जात, धर्म, भाषा यांच्यावर आधारावर कोणालाही नुकसान पोहचता कामा नये. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored