Table of Contents
मराठी भाषा गौरव दिन : २०१३
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.. अशा भावना व्यक्त करणारे मराठी भाषिक, अर्थात महाराष्ट्राचे नागरिक. मराठी भाषा खुप समृद्ध आहे, मराठी भाषेत समृद्ध साहित्य आणि साहित्यिक आहेत. अशा या मराठी भाषेच्या गौरवासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ ( marathi bhasha gaurav din ) साजरा केला जातो.
मराठी भाषा गौरव दिन ’ ( marathi bhasha gaurav din ) का आणि कधी साजरा होतो ?
मराठी भाषा गौरव दिन’ ( marathi bhasha gaurav din ) हा दरवर्षी २७ फेब्रुवारीला दरवर्षी साजरा होतो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ्य कवी आणि साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा होतो.
२१ जानेवारी २०१३ ला महाराष्ट्र शासनाने हा दिवस ( marathi bhasha gaurav din ) साजरा करण्याचा निर्णय घेतला. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेत मोठी साहित्यसेवा केली आहे. त्यांच्या कार्याचा बहुमान करण्यासाठी, त्यांना अभिवादन म्हणून कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन ( marathi bhasha gaurav din ) साजरा केला जातो.
विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या विषयी –
विष्णू वामन शिरवाडकर उर्फ त्यात्यासाहेब शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ ला पुण्यात झाला. त्यांचे मुळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांच्या काकांनी वामन शिरवाडकर यांनी दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे बालपण त्यांच्या वडिलांच्या व्यवसायाच्या गावी पिंपळगाव बसवंत या ठिकाणी गेले.
त्यांनी शिक्षण पुर्ण झाल्यावर सुरुवातील काही चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी काही काळ वृत्तसंपादक म्हणून आपली कारकिर्द घडवली. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली.
पुढे त्यांनी एक महान कवी, नाटककार म्हणून आपली ओळख स्थापित केली. त्यांना साहित्यविश्वातील ज्ञानपीठ पुरस्कार,पद्मभूषणसह अनेक मोठे पुरस्कार मिळाले. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या सेवेसह अनेक समाजउपयोगी कामेही केलेली आहे. म्हणूनच अशा महान मराठी साहित्यिकाच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी भाषा गौरव दिन ( marathi bhasha gaurav din ) साजरा होतो.
मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन या दोन्हींतील फरक –
अनेकवेळा मराठी भाषा गौरव दिन ( marathi bhasha gaurav din ) आणि मराठी राजभाषा दिन या दोन दिवसांमध्ये गल्लत केली जाते. मराठी भाषा गौरव दिन हा २७ फेब्रुवारीला आणि मराठी राजभाषा दिन हा १ मे ला साजरा होतो. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने १ मे हा दिवस मराठी राजभाषा म्हणून साजरा करण्याचा निर्णय वसंतराव नाईक यांच्या सरकारने घेतला होता. १ मे १९६६ पासून मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. आणि कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन ( marathi bhasha gaurav din )साजरा होतो.
मराठी भाषेविषयी थोडक्यात माहिती –
मराठी भाषा ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषिकांची एकुण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. भारतीय केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून ३ ऑक्टोबर २०२४ ला घोषित केले आहे.
अशा या अभिजात दर्जाच्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, पुढील पिढीमध्ये भाषेची आवड आणि जाण वाढावी यादृष्टीने मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजीत केले जातात. शाळांमध्ये मराठी गाणे, पोवाडे, कविता गायनाच्या स्पर्धा आयोजीत केल्या जातात. मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृतींचे वाचन, निबंध लेखन स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांद्वारे मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपली जाते. असा हा मराठी भाषा गौरव दिन ( marathi bhasha gaurav din ) तुम्ही कसा साजरा करता, हे आम्हाला नक्की सांगा.
जगभरातील समस्त मराठी भाषिकांना मिसलेनियस भारत कडून खुप शुभेच्छा…
- ज्योती भालेराव
This post was last modified on February 27, 2025 2:41 am