Translate :

Sponsored

Agriculture Minister Manikrao Kokate Is Palying Rummy in The Assembly, Shocking For Oppositions ! : कृषीमंत्री कोकाटेंचा भर सभागृहात मोबाईलवर रमीचा डाव, रोहीत पवारांनी केले आरोप !

Agriculture Minister Manikrao Kokate : महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना, दुसऱीकडे कृषीमंत्र्यांचे सभागृहात काय चालले आहे ? हे रोहीत पवार यांनी निर्शनास आणून दिले आहे. त्यांच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. काय आरोप केले आहेत, रोहीत पवारांनी. 

नागपूर : 20/07/2025

राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. पावसाठी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवरच रमीचा डाव मांडल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला. त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय आहे. सातत्याने आत्महत्या वाढत आहेत. कृषी मंत्र्यांच्या या बेजबाबदार वर्तनाने विरोधकच नाही तर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यावर विविध नेत्यांच्या संतत्प प्रतिक्रीया उमटत आहेत. 

“कभी गरीब के खेती पर भी आओ ना महाराज” (Agriculture Minister Manikrao Kokate )

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडवून दिली. त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर त्यांनी राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडिओने राज्यात संतापाटी लाट उसळली आहे. 

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना, काही कामच नसल्याने कृषीमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. 

रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भाव वाढीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानों कीं खेतीपर भी आओ ना महाराज ” ही आर्त हाक ऐकु येईल का ? असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे. 

विरोधकांकडून तीव्र संताप (Agriculture Minister Manikrao Kokate )

अजितदाद समज देतील

या प्रकरणी अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली. स्क्रोल करताना कृषींमंत्र्यांसमोर हा खेळ आला असेल. विरंगुळा म्हणून ते त्यांना दिसले असेल. पण त्याला मुद्दाम चुकिचे वळण देऊ नये असे ते म्हणाले. जे झाले ते चुकिचे आहे. त्यांनी सभागृहाचा दर्जा राखावा असे माझे मत आहे. अजितदाद नक्कीच त्यांना समज देतील, असे चव्हाण म्हणाले. 

जितेंद्र आव्हाडांची जोरदार टीका  (Agriculture Minister Manikrao Kokate )

या व्हिडिओवर शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टिका केली आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सत्ताधारी आमदार काय काय करतात हे समोर येत असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांविषयी उलटसूट वक्तव्य करायचे. दुसरीकडे जंगली रमीमुळे अनेक आत्महत्या झाल्या आहेत. तोच खेळ मंत्री सभागृहात खेलत असल्यावर त्यांनी टीका केली. 

सुधीर मुनगंटीवार यांनीही फटकारले  (Agriculture Minister Manikrao Kokate )

आमदार, मंत्री म्हणून आपण मर्यादा ठेवाव्यात. आपले वर्तनाने चुकीचा संदेश जाऊ नये. याविषयीची एथिकल कमिटी-नैतिक समिती निश्चितच भूमिका घेईल. कारण हा प्रकार सभागृहात झाला आहे. हा व्हिडिओ मी पाहिलेला नाही. पण राज्यात आमदारांच्या चुकिच्या वर्तणुकीवर नैतिक समिती निर्णय घेईल. सभागृहात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. 

राजू शेट्टी यांचा सवाल

या कृषीमंत्र्यांने शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली. अनुदानाचा पैसा शेतकरी लग्न कार्यासाठी वापरत असल्याचा आरोप केला. अजून काय काय मुक्ताफळं उधळली. आणि हाच माणुस आता विधानसभेच्या सभागृहात रमी खेळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यंमंत्री अजित पवार यांना असा माणुस चालतोच कसा ? असा सवाल करत याविरोधात आवाज उठवणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले. 

 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored