Ajit Pawar On Malegaon Sugar Factory Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. अजित पवारांनी या निवडणुकीत बाजी मारत ही निवडणुक जिंकली आहे. अजित पवारांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची मानली जात होती.
बारामती : 2025-06-24
Ajit Pawar On Malegaon Sugar Factory Election : बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘माळेगाव सहकारी’ साखर कारखान्याची बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज (24 जून ) पार पडली. ही निवडणुक उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी फार महत्त्वाची मानन्यात येत होती. या निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे, शेतकरी संघटनेचे चार पॅनेल रिंगणात आहेत. आता या निवडणुकीचा पहिला निकाल लागला आहे. ‘ब’ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. 102 मतांपैकी 101 वैध आहेत. त्यापैकी अजित पवार यांना ९१ मते मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवार विजयी झाले आहेत.
मतदानाची आकडेवारी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार 88.48 टक्के मतदान झाले, त्यापैकी 12 हजार 862 पुरूषांनी मतदान केले. 4 हजार 434 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 19 हजार 549 गटातील एकुण 17 हजार 296 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुसऱ्या गटात 99.02 टक्के मतदान झाले. 102 मतदारांपैकी 99 पुरूष आणि 2 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
निवडणुकीसाठी कोणते पॅनेल होते रिंगणात ?
साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार आणि चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटनेचे चार पॅनेल तयार मैदानात आहेत. या कारखान्यांमध्ये 11, 110,000 अधिक मतदार आहेत. निवडणुकित 88.48 टक्के मतदान झाले. आज मतदार निवडणूक लढवणाऱ्या नवीन उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः निवडणुकिच्या मैदानात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनल आणि शेतकरी संघाच्या नेतृत्वाखालील सदकारी शेतकरी पॅनल ही पॅनल मैदानात होती. पहिल्यांदा मतमोजणी झालेल्या ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात होते, तिथे त्यांचा मोठा विजय झाला आहे. ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार सुरूवातीपासून आघाडीवर होते. 102 पैकी 101 मतं वैध होती. त्यातीस अजित पवारांना 91मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात.