Translate :

Sponsored

Makeup Artist Vikram Gaikwad Passes Away : प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवा़ड यांचे निधन

मुंबई  : 2025-05-10

प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड (वय 61 ) यांचे मुंबईत निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पवई येथील हिरानंदानी रूग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नि आणि मुलगी असा परिवार आहे. 

अतुलनिय कलाकार गेला काळाच्या पडद्याआड 

विक्रम गायकवाड यांनी अनेक हिट चित्रपटांमधील व्यक्तिरेखांना आपल्या कलाकारीने पडद्यावर वास्तवात आणले. अनेक ऐतिहासिक चित्रपटांमधील व्यक्तिरेखांना हुबेहुब साकारण्यासाठी, विक्रम गायकवाड यांच्या मेकअपचे मोलाचे योगदान आहे. अलिकडील काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्ज ऑफ हिंदुस्थान, शहिद भगतसिंग अशा कित्येक एतिहासिक वेशभुषेसाठी ते ओळखले जातात. त्यांनी रंगभूषा केलेल्या कित्येक भूमिका पडद्यावर साक्षात मुळ एतिहासिक व्यक्तिरेखेसारखेच भासत असत इतकी त्यांच्या हातात जादू होती. 

विक्रम गायकवाड यांच्या महत्त्वाच्या कलाकृती 

 लोकमान्य एक युगपुरूष, काशिनाथ घाणेकर, बालगंर्ध, पानिपत, बेल बॉटम, उरी, दंगल, पिके, झांशी, सुपर 30, केदारनाथ, छत्रपती शिवाजी महाराज  पावनखिंड, फत्ते शिकस्त, शेर शिवराज या ऐतिहासिक मालिका, थ्रि इडियटस्, भाग मिल्खा भाग यांसारख्या चित्रपटांतील व्यक्तिरेखांसाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले आहे.  

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored