Maharashtra Ration Card Holder : महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. रेशनकार्ड धारकांना आता गहू आणि तांदूळ या धान्यासोबत ज्वारीसुद्धा मोफत मिळणार आहे. कधी पासून ही योजना सुरू होणार आहे हे जाणून घ्या.
पुणे : 14/10/2025
महाराष्ट्रातील रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता रेशनकार्डधारकांसाठी (Maharashtra Ration Card Holder) दिवाळीच्या तोंडावर एक चांगली योजना आली आहे. त्यांना आता गहू आणि तांदुळासह ज्वारीसुद्धा मोफत मिळणार आहे. या तीनही धान्यांचे वितरण आता मोफत केले जाणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय ज्वारीचे भरपूर पिक मागच्यावर्षी झाले होते म्हणून घेतला आहे. सरकारने ज्वारीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे हे मोफत वितरण शक्य होणार आहे.
केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात धान्य खरेदीचे आदेश करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारने त्वरीत त्याची अंमलबजावणी करत, गरजू लोकांपर्यंत हा माल पोहोचवण्याची योजना आखली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि गरीबांपर्यंत पोषणयुक्त धान्य पोहोवले जावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबरपासून पुढील दोन महिन्यापर्यंत रेशनकार्ड धारकांना ज्वारीचे मुफ्त वितरण करण्यात येणार आहे.
राज्याच्या अन्न व नागरी प्रशासन विभागाकडून सर्व जिल्ह्यांना याविषयीचे आदेश देण्यात आले आहेत. हे वितरण सर्व जिल्ह्यात विशेषतः अंत्योदय आणि प्राथमिक कुटुंब योजनेच्या लाभार्थिंना करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
एक किलो ज्वारीचे होणार वितरण (Maharashtra Ration Card Holder)
या आदेशाप्रमाणे प्रत्येक लाभार्थीला प्रत्येकी एक किलो ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले गेले आहेत. दोन महिन्यासाठी पुरेल इतकी ज्वारी खरेदी कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे ज्वारीसारख्या पिकांना चांगले मार्केट मिळावे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती मिळावी आणि पोषममुल्यांच्या दृष्टीनेही विचार व्हावा असे तिहेरी हेतू साध्य होणार आहेत. या योजनेमुळे ग्रामीण भागातील त्या जनतेला जास्त फायदा होणार आहे, जिथे ज्वारी आहारातील मुख्य घटक आहे.
12 जिल्ह्यात होणार वितरण (Maharashtra Ration Card Holder)
या योजनेअंतर्गत राज्यातील 12 जिल्ह्यांना प्रामुख्याने मोफत ज्वारी मिळणार आहे. यात पुणे शहर, पुणे जिल्हा, सातारा, सांगली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहमदनगर, लातूर, सोलापूर शहर आणि जिल्हा यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांसाठी एकुण 22,766 टन ज्वारीचा कोटा निश्चित केला आहे. आता नोव्हेंबरपासून पुढील दोन महिने ज्वारीचे मोफत वितरण होणार आहे.