Translate :

Sponsored

Maharashtra Professor Recruitment, Big News : महाराष्ट्र प्राध्यापक भरतीसाठी मिळाली मुदतवाढ ! कधीपर्यंत वाढली मुदत ? जाणून घ्या : Maharashtra Profesoor Recruitment Turn

महाराष्ट्र प्राध्यापक भरतीसाठी मुदतवाढ दिली आहे.

Maharashtra Professor Recruitment : बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी अर्जाची मुदतवाढ मिळाली आहे. कोणत्या तारखेपर्यंत ही वाढ मिळाली आहे हे जाणून घ्या.

छत्रपती संभाजीनगर : 06/11/2025

महाराष्ट्र प्राध्यापक भरतीमध्ये एक बदल झाला आहे. प्रोफेसर पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेत 15 दिवसांची मुदतवाढ करण्यात आली आहे. आता उमेदवारांना 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही अर्ज करण्याची वेळ सुरू रहाणार आहे. तसेच उमेदवारांना हार्ड कॉपीही सादर करावी लागणार आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना हार्ड कॉपी सादर करायची आहे.

कोणत्या पदांसाठी ही भरती ? ( Maharashtra Professor Recruitment )

खरं तर ही भरती शिक्षण पदांसाठी आहे. या पदांमध्ये प्रोफेसर, असोसीएट प्रोफेसर, असिंटंट प्रोफेसर या पदांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे या भरतीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. येथेच अर्ज मागवण्यात आले आहेत. एप्रिल 2025 मध्ये ज्या कुणी उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज केले आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, पण त्यांच्या अर्जात काही त्रुटी असतील तर ते या काळात उमेदवारांना सुधारता येणार आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क मागवण्यात येणार नाही.

किती पदे आणि कशी होणार भरती ? ( Maharashtra Professor Recruitment )

अर्ज समर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. नवीन नियमावलीनुसार उमेदवारांनी ‘ATR’ फॉर्म भरावा आणि संबंधित कागदपत्रांसह हार्ड कॉपी सादर करायची आहे. शिक्षकांच्या एकुण 73 जागांसाठी ही भरती प्रक्रिया योजीली आहे. 289 जागा भरतीसाठी मंजूर करण्यात आल्या होत्या त्यातील 130 जागांवर प्राध्यापक सध्या सक्रिय आहेत तर उर्वरित 159 जागा रिक्त आहेत. आतापर्यंत या भरतीसाठी 5026 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे स्पर्धेपासून स्वतःला वाचविण्याकरिता उमेदवारांनी शक्य तितके लवकर अर्ज करावे. संवैधानिक अधिकारी पदे असून एकुण 8 पदांसाठीही 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. एकंदरीत, अधिष्ठाता (4 पदे), संचालक (5 पदे) यासाठी अर्ज मागविले जात आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकपद भरले गेले, परंतु काही पदे अद्याप रिक्त आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक आणि संवैधानिक अधिकारी पदांसाठी अर्जाची मुदतवाढ दिली आहे. मात्र उमेदवारांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा आणि 24 नोव्हेंबरपर्यंत हार्ड कॉपी सादर करावी.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored