Translate :

Sponsored

Maharashtra Kesari, 2026 Great News : वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा सामना, कोणाची होणार मानाची गदा ? , ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे फुंकले रणशिंग

वाघोलीत रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा सामना, कोणाची होणार मानाची गदा ? , ६८ व्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचे फुंकले रणशिंग ! ( फोटो- संग्रहीत, सोशल मीडिया)

Maharashtra Kesari, 2026 : महाराष्ट्रातील सर्व कुस्ती प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात लवकरच वाघोलीमध्ये कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. कधी असणार आहेत या स्पर्धा जाणून घेऊ.

पुणे : 19-02-2026

कुस्तीगीरांच्या आणि कुस्तीप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेली६८ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब‘  (Maharashtra Kesari, 2026)  लढत पुण्यात रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे आणि आयोजक रामकृष्ण सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली

या स्पर्धा १८ ते २२ मार्च या कालावधीत वाघोली येथे होणार आहेमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र केसरीकिताबाच्या विजेत्याला १ किलो चांदीची गदा आणि भव्य रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. महाराष्ट्रातील ४२ जिल्हा व शहर कुस्तीगीर संघांतील सुमारे ८४० कुस्तीगीर (गादी व माती विभाग) यात ताकद आजमावणार आहेत. स्पर्धेच्या पारदर्शकतेसाठी १०० तांत्रिक अधिकारी, ८४ संघ व्यवस्थापक आणि ८४ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.

कधी असणार आहे स्पर्धेचे उद्धाटन –  (Maharashtra Kesari, 2026 )

स्पर्धेचे उद्घाटन दि १८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होईल, तर बक्षीस वितरण समारंभ २२ मार्च रोजी सायंकाळी ६  वाजता पार पडेल.

या स्पर्धेत चार गट पाडण्यात आले आहे. गादि आणि माती गटात होणाऱ्या या स्पर्धेत- (Maharashtra Kesari, 2026 )

  • महाराष्ट्र केसरी अ गटात –  57 किलो, 86 किलो,
  • महाराष्ट्र केसरी ब गटात – 61 किलो, 79 किलो,
  • क गटात 65 किलो, 74 किलो आणि 92 किलो तसेच
  • ड गटात 70 किलो आणि 97 किलो वजनी गटात होणार आहे

अंतिम फेऱ्या आणिमहाराष्ट्र केसरीकिताबाची मुख्य लढत दि 22 मार्च रोजी होणार आहे

या स्पर्धेच्या  नियोजनासाठी (Maharashtra Kesari) राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, मुख्य आयोजक रामकृष्ण सातव पाटील आणि राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे हे विशेष परिश्रम घेत आहेत

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored