Translate :

Sponsored

Maharashtra Flood Relief, Big Announcment : अजित पवार, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या मंत्र्यांचीही शेतकऱ्यांना मदत : Eknath Shinde, Ajit Pawar, Shivsena MLAs Ministers Will Danate One Month salary For Flood Affected Farmers.

Eknath Shinde

Maharashtra Flood Relief : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. शिवसेनेचे काही मंत्री हे सुद्धा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपले एक महिन्याते वेतन देणार आहेत.

मुंबई : 25/09/2025

महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती (Maharashtra Flood Relief) निर्माण होऊन, शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांनी पूरग्रस्त गावांचा दौरा करून पाहणी केली आहे. प्रत्यक्ष परिस्थीती पाहून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. अशावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितले आहे की, आम्ही आणि आमचे सरकारन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आता मोठे संकट कोसळले आहे. अशावेळी प्रत्येकाने राजकारण न करता, तेथे भेट देऊन, मदत करणे आवश्यक आहे. आमचे आमदार आणि मंत्री यांनी एक महिन्याचे वेतन शेतकरी बांधवांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनीच या परिस्थीतीत आपले योगदान द्यावे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, सरकार त्यांच्यासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम शेतकऱ्यांसोबत असतात. केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून शक्य तितकी मदत केली जाणार आहे.

स्वच्छता मोहीमेला पाठिंबा ( Maharashtra Flood Relief)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात ‘स्वच्छता हीच सेवा अभियान’ सूरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत राज्य आणि शहरांमध्ये स्वच्छता मोहीम अभियना चालवण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अभियानात सहभाग घेऊन, स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण केली.

यावेळी ते म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही एक दिवस किंवा एक वर्षापुरती मोहीम नसून, ही चळवळ कायम चालणारी आहे.

महाराष्ट्रातही स्वच्छता हीच सेवा – एकनाथ शिंदे

त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यापासून स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात केली. त्यांनी स्वतः स्वच्छता करून या अभियानाला सुरूवात केली होती. आज आम्हीही या अभियानाला पुढे नेत आहोत. महाराष्ट्रात स्वच्छता हीच सेवा आहे, आणि आम्ही तेच करत आहोत.

शिंदे यांनी यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना समाजाचे खरे हिरो म्हणून संबोधले. त्यांनी सांगितले की, उघड्यावर कचरा टाकू नका, आणि कोणाला टाकू देऊ नका. यासाठी घरा-घरांत जाऊन यासाठी लोकांना जागरूक करणे सूरू आहे. पंतप्रधान मोदींच्या या संकल्पनेला महाराष्ट्रातही योगदान दिले जात आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored