Translate :

Sponsored

Maharashtra Election Update : राज्यातील सर्व निवडणुका महायुती एकत्र लढतील ; देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis )

महाराष्ट्र : 2025-05-16

सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यात लवकरच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या (Maharashtra Election )निवडणुका होणार आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.  आम्ही सुद्धा या निवडणुका महाआघाडी म्हणून एकत्र लढू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis ) यांनी आज सांगितले की, त्यांचे सरकार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेण्याचा आम्ही प्रयत्न करून आणि महायुती एकत्रितपणे या निवडणुका लढवेल. 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis ) यांनी यावेळी सांगितले की, महायुती आघाडीतील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्ष (भाजप ), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (राष्ट्रवादी ) आणि शिवसेना असे तिनही पक्ष शक्य असेल तिथे एकत्र लढू. 

एकत्र राहून निवडणुका लढू 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, महायुती शक्य असेल तिथे एकत्र राहून या निवडणुका लढणार आहे. प्रचारादरम्यान मित्रपक्ष एकमेंकांवर टिकाटिपण्णी  करण्याचे टाळतील यावर भर दिला जाईल. पुढे ते म्हणाले आम्ही राज्यात वेेळेवर निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. जर काही भागात पाऊस जास्त असेल तर निवडणुक आयोगाकडून आम्ही पंधरा दिवसांची मुदतवाढ मागू. 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांमुळे पाच वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस नगर आयुक्त आणि नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या एका कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी पुण्यात आले होते. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored