Maharashtra Ganeshotasv 2025 : महाराष्ट्रात भाजप नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सव हा आता राज्योत्सव म्हणून घोषित केल्याची घोषणा केली आहे. हे मुंबईच्या पावसाळी अधिवेशनात जाहीर झाले. या निर्णयाने गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
मुंबई : 10/07/2025
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला गणेशोत्सवाला ( Maharashtra Ganeshotasav ) अवघे काही महिने शिल्लक असताना, आता एक नविन घोषणा केली आहे. गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आगामी गणेशोत्वाबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली.
हेमंत रासनेंनी केली मागणी
सध्या राज्य सरकारचे पावसाठी अधिवेशन सुरू आहे. यावेळी भाजप आमदार हेमंत रासणे यांनी सभागृहात गणेशोत्सवाचे महत्तव सांगण्यावर भर दिला आहे. ” सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. गणेश मंडळे अनेक सामाजिक कार्य करत असतात. आता या उत्सवावर काही बंधने आली आहेत. पण आता महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर करावा, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
काय म्हणाले आशिष शेलार ?
हेमंत रासने यांच्या या मागणीला मंत्री आशिष शेलार यांनी दुजोरा देत उत्तर दिले. महाराष्ट्राचा गणेशोस्तव हा 1893 रोजी लोकमान्य टिळकांनी सुरू केला. त्यापूर्वी घरोघरी हा उत्सव सुरू होता. महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा आता आपण महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे आजच मी स्पष्ट करतो. देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्याप्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहील, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
विसर्जन पारंपरिक पद्धतीनेच होणार (Maharashtra Ganeshotasav 2025)
देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवाबाबत अत्यंक स्पष्ट भमूिका मांडली आहे. पीओपी (POP) मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही, असे आशिष शेलार यांनी नमूद केले.
आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शंभर वर्षांच्या परंपरेला कोणी खंडित केले असेल, तर ते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. गणेशोत्सवावर काही लोकांनी ‘स्पीडब्रेकर’ आणले होते, पण आपल्या सरकारने ते दूर केले आहे” असे आशिष शेलारांनी म्हटले. या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.