महाराष्ट्र : सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश अबितकर यांनी सांगितले की, एप्रील 2024 ते फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 12,000 पेक्षा जास्त लहान मुलांचे मृत्यू झाले आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.
मुंबई : 07/07/2025
महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशनात राज्यात झालेल्या घटना आणि दुर्घटना यांच्या आकडेवारी मांडण्यात येत आहे. याच अधिवेशनाचा भाग म्हणून महाराष्ट्राचे सार्वजनिक आणि कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश अबितकर यांनी लहान मुलांच्या मृत्यूशी निगडीत आकडे जाहीर केले आहेत. त्यासह मराठवाडा भागातील 8 जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचीही आकडेवारी जाहीर केली आहे.
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश अबितकर यांनी सांगितले आहे की, एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत राज्यात 12, 000 पेक्षा जास्त मुलांचे मृत्यू झाले आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील 10 विधान परिषद सदस्यांनी हा प्रश्न विचारला होता की, एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत राज्यात खरोखर 12, 438 इतक्या संख्येने मुलांचे मृत्यू झाले आहेत का ? त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.
Table of Contents
कोल्हापूर मध्ये 1,736 लहान मुलांचे मृत्यू
विरोधी पक्षांनी विचारलेल्या कोल्हापूर मधील एका प्रश्नाविषयी उत्तर देताना अबितकर यांनी सांगितले आहे की, कोल्हापूरमध्ये 11 नवजात बालकांसहीत 1,736 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांनी नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा कोणताही उल्लेख केला नाही.
मराठवाड्यामध्ये 520 शेतकरी आत्महत्या
मराठवाडा क्षेत्रात 8 जिल्ह्यांमध्ये यावर्षी जानेवारी महिन्यापासून 26 जून महिन्यापर्यंत 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागच्या वर्षींच्या आकडेवाडीनुसार यावर्षी ही संख्या वीस ट्क्कयांनी वाढली आहे. राज्यसरकारच्या रिपोर्ट मध्ये ही आकडेवारी नमुद करण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मागच्या सहा महिन्यात 126 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. रिपोर्टनुसार 2024 मधील जानेवारी ते जून महिन्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवले आहे. 2025 मध्ये जानेवारी ते जूनमध्ये याच भागात 520 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या आकडेवारीनुसार जवळजवळ वीस टक्के आत्महत्या वाढल्या आहेत.
जानेवारी ते जून 2025 दरम्यान जिल्हावार शेतकरी आत्महत्या आकडेवारी
| क्रमांक | जिल्हा | आत्महत्या संख्या |
| 1 | बीड | 126 |
| 2 | छत्रपती संभाजीनगर | 92 |
| 3 | नांदेड | 74 |
| 4 | परभणी | 64 |
| 5 | धाराशिव | 63 |
| 6 | लातूर | 38 |
| 7 | जालना | 32 |
| 8 | हिंगोली | 31 |
बीड मध्ये सर्वात जास्त आत्महत्या
रिपोर्टनुसार जानेवारी ते जून 2024 दरम्यान मराठवाडा क्षेत्रात आत्महत्या जास्त प्रमाणात झाल्या आहेत. सर्वाधिक बीड जिल्ह्यात 101 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या रिपोर्ट मध्ये असेही नमुद करण्याक आले आहे की यावर्षी 2025 मध्ये 313 आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी 264 प्रभावित कुटुंबाला शासकिय मदत दिली गेली आहे. यातील 146 प्रकरणांची पडताळणी सुरू आहे, त्यामुळे हे प्रकरणं प्रलंबित आहे. 61 प्रकरणात नुकसान भरपाई देण्यासाठी पात्र नाहीत. तर हाच आकडा जानेवारी ते जनू 2024 मध्ये पात्र नसणारे कुटुंब होते.