Translate :

Sponsored

Maharashtra Cabinet 3 Big Decision Amendments In Excise Duty Stipend : राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय ! विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढणार, उत्पादन शुल्कातही सुधारणा.

Maharashtra Cabinet 3 Big Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातही वाढ करण्यात आली आहे. तसेच उत्पादन शुल्कातही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : 2025-06-10

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितील आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या महत्त्वाच्या निर्णयापैकी पहिला निर्णय आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा दिला जाणार आहे. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातही वाढ करण्यात आली आहे. तसेच उत्पादन शुल्कातही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीनही निर्णयाची सविस्तर बातमी.

पहिला निर्णय – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना 

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणले जाणार आहे. याबाबत सामाजिक न्याय विभागाने माहिती दिली आहे. यामुळे अनुसूचित जातीच्या नागरिकांना फायदा होणार आहे.

दुसरा निर्णय- उत्पादन शुल्कामध्ये वाढ

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मद्यावरील शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सरकारला अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. 

तिसरा निर्णय – पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ

राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6250 रूपयांची वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10 हजार रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आठ हजार रुपयांचे विद्यावेतन  (वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग ) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वरील सर्व विद्यार्थ्यांना आता मोठा फायदा मिळणार आहे. 

पुस्तक प्रकाशन आणि पत्रकार परिषद

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 11 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात मोदींच्या 11 वर्षांच्या कार्याचा आढावा आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातावर भाष्य केले. आगामी काळात लोकलमधील गर्दी कशी कमी करता येईल ? तसेच लोकलची संख्या कशी वाढवता येईल यावर सरकार प्रयत्नशील आहे, अशे फडणवीस यांनी सांगितले.  

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored