Translate :

Sponsored

Maharashtra Board Exam Dates, Big News : महाराष्ट्र बोर्ड परीक्षेेची तारीख जाहीर, जाणून घ्या 10 वी, 12 वी परीक्षेच्या तारखा !

महाराष्ट्रा शिक्षण मंडळाने 10 वी, 12 वी परीक्षाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

Maharashtra Board Exam Dates : महाराष्ट्र बोर्डाने 10 वी आणि 12 वीच्या 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. कधी होणार आहेत या परीक्षा आपण जाणून घेऊ.

पुणे : 14/10/2025

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board ) पुढीलवर्षी म्हणजे 2026 मध्ये होणाऱ्या 10वी (SSC) आणि 12 वी (HSC) च्या बोर्ड परीक्षांची तारीख घोषीत केली आहे. मंडळाने ही घोषणा आपल्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर केली आहे. मंडळाची वेबसाईट आहे, mahahsscboard.in या वेबसाईटवर तुम्हाला याविषयीची अधिकृत माहिती मिळू शकते.

मंडळाने ही तारीख बरीच आधी जाहीर केली आहे कारण शाळा, महाविद्यालयं आणि विद्यार्थी यांना आपला अभ्यासक्रम आणि अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करण्यास मदत होईल. नियोजनानुसार महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2026 मध्ये फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान होणार आहेत.

12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक ( Maharashtra Board Exam Dates )

12 वी ची परीक्षा 10 फेब्रुवारी ला सुरू होणार आहे. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 12 वीच्या परीक्षा होणार आहेत. याआधी 12 वीच्या प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षेचे मूल्यांकन 23 जानेवारीपासून 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत होणार आहेत.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाने अजून निश्चित वेळापत्रक जाहीर केले नाही, मात्र 12 वी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर 10 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर इतर विषयांची परीक्षा होणार आहे.

10 वी परीक्षेचे वेळापत्रक ( Maharashtra Board Exam Dates )

10 वी बोर्डाचे (SSC) पेपर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत असणार आहेत. 10 वी च्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल आणि व्हायवा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. संपूर्ण वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored