Translate :

Sponsored

Maharashtra 11th online Admission Process : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; पहिल्या यादीची तारीख जाहीर

Maharashtra 11th online Admission Process : यावर्षीचे 2025-2026 पासून महाराष्ट्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. 8 जूनला शून्य फेरी आणि 10 जूनला कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 

महाराष्ट्र : 2025-06-05

राज्यामध्ये सन 2025-2026 या वर्षासाठीच्या उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत आज अंतिम मुदतीपर्यंत एकुण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती प्र. संचालक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली. 

या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या फेरीमध्ये 9,435 नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एकुण विद्यार्थी प्रवेश क्षमता 21,23,040 इतकी असून त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता 18,97,526 इतकी आहे. कोटा प्रवेश क्षमता 2,25,514 इतकी आहे. 

8 जूनला पहिली यादी प्रसिद्ध होणार

वेळापत्रकानुसार शून्य फेरी गुणवत्ता यादी 8 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. दिनांक 9 जून ते 11 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहे. तसेच कॅप फेरीची गुणवत्ता यादी 10 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. 11 जून ते 18 जून 2025 याकालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष्य प्रवेश होणार आहेत. 

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन महिती मिळू शकते. https://mahafyjcadmissions.in पहावे. तसेच इमेल आयडी support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन नंबर आहे 8530955564 या नंबरवरून तुम्ही माहिती मिळवू शकता. शिक्षण संचालनालयातर्फे असे आवाहन करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांची वर्गवारी

  • 12,15,190 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी शुल्क भरले.
  • 12,05,162 विद्यार्थ्यांनी अर्ज भाग 1 भरलेले आहेत.
  • अर्ज भाग -2 भरून अंतिम करून 11,29,924 विद्यार्थ्यांनी लॉक केले आहेत.
  • नियमित फेरी कॅप राऊंडसाठी 11,29,932 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
  • इनहाऊस कोटा साठी 64,238 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
  • व्यवस्थापन कोटासाठी 32,721 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
  • अल्पसंख्याक कोटासाठी 47,578 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored