Translate :

Sponsored

Madhuri Misal Pune Corporation, Pune News 2026 : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या गावांचे नियोजन आता महापालिकेकडे, माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश : The Government Has Taken A Big Decision Due To The Follow Up Of Madhuri Misal

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या गावांचे नियोजन आता महापालिकेकडे.

Madhuri Misal Pune Corporation : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सन 2011 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांचे नियोजन आता पुणे महानगरपालिकेकडे असणार आहे.

पुणे : 13-02-2026 

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत (Madhuri Misal Pune Corporation)  सन 2021 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएची नियुक्ती रद्द कऱण्यात आली असून, आता पुणे महानगरपालिका नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. या संदर्भातील नगरविकास विभागाची अधिसूचना काल प्रसिद्ध झाली. त्यानुसार 23 गावांसाठी विकास आराखडा मंजुरी, बांधकाम परवानग्या, पायाभूत सुविधा उभारणी आणि नागरी सेवा यामध्ये एकसंघ व सुसूत्र नियोजनास गती मिळणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

मिसाळ म्हणाल्या, या निर्णयासाठी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. पुणे महानगरपालिका, प्रादेशिक विकास प्राधिकरण आणि नगर विकास विभाग यांच्यातील प्रशासकीय प्रक्रियेतील अडथळे दूर केले. विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करून थेट महानगरपालिकेकडे अधिकार हस्तांतरित करण्यात येणार आहे.”

या गावांना होणार फायदा  ( Madhuri Misal Pune Corporation )

म्हळुंगे, सुस, बावधन (बु.) , किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सनसनगर, मांगेवाडी, भिलारेवाडी, गुजर, निंबाळकरवाडी, जांभुळवाजी, कोळेवाडी आणि वाघोली या गावांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याते मिसाळ यांनी सांगितले.

माधुरी मिसाळ काय म्हणाल्या ? ( Madhuri Misal Pune Corporation)

” हा निर्णय पुणे शहराच्या सर्वांगीण आणि समतोल विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, समाविष्ट 23 गावांच्या दीर्घकालीन विकासासाठी, नियोजनबद्ध पायाभूत सुविधा उभारणीसाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानते.”

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored