LPG Gas Supply News : देशात एलपीजी आणि सीएनडी पुरवठा सुरळीत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच आखाती देशांत अडकलेल्या 2.8 लाख भारतीयांनी मायदेशी आणण्यात यश आले आहे.
नवी दिल्ली : 19-03-2026
देशात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG Gas Supply News) गॅसबाबत निर्माण झालेला संभ्रम आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी देशातील इंधन स्थिती समान्य असून कच्च्या तेलाचा पुरवठा आणि रिफायनरीचे काम नियमित सुरू असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन संपल्याची अधिकृत नोंद नसून सर्व आऊटलेटस पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.
कमर्शियल ग्राहकांना ‘सीएनजी’कडे वळण्याचे आवाहन (LPG Gas Supply News)
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती पीेएनजी (PNG) आणि वाहतुकीसाठी लागणाऱ्या सीएनजीचा (CNG) पुरवठा 100 % खात्रीशीर असून त्यात कोणतीही कपात केलेली नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना शक्य तिथे सीएनजीचा वापर कऱण्याचे आवाहन केले आहे. यासाठी अनेक कंपन्यांनी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. जे राज्य पीएनजी नेटवर्कच्या विस्तारासाठी मदत करतील, त्यांना 10 % अतिरिक्त कमर्शियल एलपीजी देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. गेल्या दोन आठवड्यांत सव्वा लाख नवीन गॅस कनेक्शन्स देण्यात आली आहेत.
युद्धाच्या सावटाखाली ऑनलाईन बुकिंगमध्ये वाढ ( LPG Gas Supply News)
जागतिक युद्धाच्या परिस्थितीमुळे एलपीजीच्या जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असला, तरी भारतात वितरणाबाबत कोणतीही कमतरता नाही. सध्या एलपीजीचे ऑनलाईन बुकिंग 94% पर्यंत पोहोचले असून, 83 % पेक्षा जास्त डिलिव्हरी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (DAC) द्वारे केली जात आहे. “घाबरून जाऊन (Panic Booking) जास्तीचे सिलेंडर बुक करण्याचे प्रमाण कमी झाले असून काल एका दिवसात 57,000 रिफिल बुकिंग झाले आहेत.” असे सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले. तसेच 17 राज्यांनी व्यावसायिक एलपीजीसाठी वाटप आदेश जारी केले आहेत.
देशात गॅस पुरवठा सुरळीत आहे.
रशिया-ऑस्ट्रेलियातून आयातीचा वेग वाढला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने नागरिकांना शक्य तेथे सीएनजीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.